ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्राने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. प्रियांकाने आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. ती तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. जेव्हा जेव्हा अभिनेत्रीला तिच्या बिझी शेड्यूलमधून वेळ मिळतो तेव्हा ती पती निक आणि मुलगी मालतीसोबत वेळ घालवण्याची संधी सोडत नाही. दरम्यान, प्रियांका आणि निकच्या सुट्टीचे फोटो इंटरनेटवर चर्चेत असतात. प्रियांकाच्या या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
प्रियांका चोप्रा पती निक जोनस आणि मुलगी मालतीसोबत फ्रान्समध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुट्टीचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढला आहे. प्रियांकाच्या या फोटोंमध्ये निक आणि मुलगी मालती मजा मस्ती करताना दिसत आहेत.
प्रियांका चोप्राने या फोटोंमध्ये बिकिनी परिधान केली आहे. तसेच आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट केल्याचे दिसत आहे. अभिनेत्री क्रूझवर बिकिनी घालून आपल्या पतीसोबत किलर स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. एका फोटोत प्रियांका पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. तर एका फोटोमध्ये ती बिकिनी आणि चष्मा घालून समुद्राच्या मधोमध बोटीवर झोपलेली दिसत आहे. प्रत्येक फोटोमध्ये प्रियांकाची खास स्टाईल पाहायला मिळत आहे. अशातच तिची मुलगी मालतीसोबत मस्ती करताना पाहून नेटकऱ्यांना आनंद झाला आहे. काहींनी प्रियांकाच्या या हॉट लूकवर कमेंट केल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर प्रियांकाच्या या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे .
वाचा : म्हणून मी लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणं बंद केलं ; अभिनेत्रीनं सगळंच सांगून टाकलं!
प्रियांका चोप्रा ने आपल्यापेक्षा १० वर्षांनी लहान अमेरिकन गायक निक जोनससोबत लग्न केले आहे. दोघांनी २०१८ मध्ये लग्न केले होते. त्यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. लग्नानंतर प्रियांका आणि निकने २०२२ मध्ये सरोगसीद्वारे एका मुलीला जन्म दिला. तिचे नाव मालती मेरी चोप्रा जोनास असे आहे. आता सोशल मीडियावर प्रियांकाचे कुटुंबासोबतचे फोटो सतत व्हायरल होताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर प्रियांकाचे फ्रान्समध्ये फिरतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांकाने बिकिनी परिधान केल्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे.