Viral Video: सुजलेले पाय, रक्ताळलेल्या जखमा आणि लसणाची मसाज; ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा नक्की झालंय तरी काय?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: सुजलेले पाय, रक्ताळलेल्या जखमा आणि लसणाची मसाज; ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा नक्की झालंय तरी काय?

Viral Video: सुजलेले पाय, रक्ताळलेल्या जखमा आणि लसणाची मसाज; ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा नक्की झालंय तरी काय?

Jun 27, 2024 06:33 PM IST

Priyanka Chopra Viral Video: प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. मात्र, चाहत्यांचे सर्वात जास्त लक्ष वेधले गेले ते प्रियांकाच्या २ व्हिडीओंमुळे…

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा नक्की झालंय तरी काय?
‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा नक्की झालंय तरी काय?

Priyanka Chopra Viral Video: बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने आज सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ग्लोबल आयकॉन बनलेली प्रियांका चोप्रा सध्या अनेक आव्हानांना तोंड देत आहे. हॉलिवूड चित्रपट 'द ब्लफ'च्या शूटिंगदरम्यान ही अभिनेत्री जखमी झाली आहे. प्रियांका चोप्राला ॲक्शन सिक्वेन्स करताना अनेकदा गंभीर दुखापत झाली आहे. आता तिने तिच्या नव्या पोस्टमध्ये तिची हीच स्थिती दाखवली आहे. नुकतेच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. मात्र, चाहत्यांचे सर्वात जास्त लक्ष वेधले गेले ते प्रियांकाच्या २ व्हिडीओंमुळे. यातील एकामध्ये प्रियांका चोप्रा आपली दुखापत दाखवताना दिसली आहे. तिच्या पायाला झालेल्या जखमा पाहून चाहतेही घाबरले आहेत. अभिनेत्रीची अवस्था पाहून यूजर्स आता चिंतेत पडले आहेत. प्रियांका चोप्राला खूप वेदना झाल्यामुळे ती पायांना बँडेज बांधून शूटिंग करत आहे. तिची ही अवस्था पाहून तुम्हाला समजेल की, तिला यावेळी किती वेदना होत असतील.

KBC 16: 'आयुष्य प्रत्येक वळणावर प्रश्न विचारेल आणि तुम्हाला उत्तर द्यावं लागेल'; अमिताभ बच्चन पुन्हा येतायत!

देसी गर्लचे ‘देसी’ उपाय!

आश्चर्याची गोष्ट म्हणजे परदेशात राहूनही प्रियांका चोप्रा तिच्या वेदनांवर मात करण्यासाठी औषधांचा नव्हे तर घरगुती उपायांचा अवलंब करत आहे. आता प्रियांकाने स्वतःचा एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. यामध्ये कोणीतरी प्रियांका चोप्राच्या तळव्यांना लसणाच्या पाकळ्यांनी मसाज करत असल्याचे दिसत आहे. आता अभिनेत्री असे का करत आहे आणि त्यातून काय होणार? तुमच्याही मनात हाच प्रश्न येत असेल. तर, लसणाच्या पाकळ्यांनी पायाची मालिश केल्याने दुखण्यापासून आराम मिळतो. याशिवाय पायांची सूजही कमी होते. हा एक प्रचलित घरगुती उपाय आहे.

चाहते पडले काळजीत!

आता हे घरगुती उपाय पाहून तिचे चाहतेही प्रभावित झाले आहेत. अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. या पोस्टवर कमेंट करत एका व्यक्तीने लिहिले की, 'या सर्व जखमा खूपच चिंताजनक आहेत. कृपया स्वतःची काळजी घे.’ एकाने लिहिले की, ‘वेलकम बॅलेरीना... ऑस्ट्रेलियात आपले स्वागत आहे.' आणखी एका चाहत्याने लिहिले, 'कृपया स्वतःची काळजी घे'. चाहते प्रियांकाविषयी आपली काळजी व्यक्त करत आहेत. काही लोक प्रियांकाचे हे देसी उपचार पाहून तिचे खूप कौतुक करत आहेत. दुसरीकडे, यावरून काहीजण प्रियांकाला ट्रोलही करत आहेत. अनेक लोक या व्हिडीओवर कमेंट करून म्हणत आहेत की, सेलिब्रेटी चेहरा ठीक करून घेतात, पण त्यांचे वय त्यांच्या पायावरून कळू शकते.

Whats_app_banner