मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Priyanka Chopra New House: प्रियांकाने का सोडले १६५ कोटींचे घर? कारण आले समोर, शेअर केला नव्या बंगल्याचा फोटो

Priyanka Chopra New House: प्रियांकाने का सोडले १६५ कोटींचे घर? कारण आले समोर, शेअर केला नव्या बंगल्याचा फोटो

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 02, 2024 09:28 AM IST

Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियांका चोप्राने लॉस एंजलिसमधील १६५कोटी रुपये किंमत असलेले घर सोडले आहे. त्या मागिल कारण देखील आता समोर आले आहे.

Priyanka Chopra And Nick Jonas
Priyanka Chopra And Nick Jonas

Priyanka Chopra And Nick Jonas: २ डिसेंबर २०१८ साली जोधपुरमधील उमेद भवन पॅलेसमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राने हॉलिवूड गायक निक जोनासशी लग्न केले. लग्नानंतर प्रियांका अमेरिकेत शिफ्ट झाली. लग्नानंतर प्रियांकाने लॉस एन्जलिसमध्ये १६५ कोटी रुपये किंमत असलेला बंगला खरेदी केला होता. मात्र, आता प्रियांकाने हा बंगला सोडला असून नवे घर खरेदी केल्याचे समोर आले आहे.

प्रियांका झाली दुसऱ्या घरात शिफ्ट

प्रियांका चोप्राने नुकताच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका खोलीत बसली आहे. तसेच तेथे मोठी खिडकी आहे. तेथे टेबल आणि खुर्ची देखील दिसत आहे. सोबतच बाहेरील सुंदर देखावा दिसत आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये पंकज उधास यांचे 'आहिस्ता' हे गाणे वाजताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत प्रियांकाने 'पावसाळा माझ्यासाठी खूप खास असतो. कोणा कोणाला हे गाणे लक्षात आहे?' असे कॅप्शन दिले आहे. प्रियांका या नव्या घरात किती दिवस राहणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
वाचा: 'मुलांना शिस्त शिकवली नाही', जेहचे वागणे पाहून नेटकरी संतापले

Priyanka New House
Priyanka New House

प्रियांकाने का सोडले जुने घर

२० मिलियन डॉलर किंमत असलेले म्हणजेच १४९ कोटी रुपयांचे लॉस एंजलिसमधील घर खाली केले. या घरात पाण्याचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे प्रियांकाने हे घर सोडण्याचा मोठा निर्णय घेतला. प्रियांकाने हे घर तिला ज्या व्यक्तीने विकले त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी प्रियांकावर आर्थिक संकट कोसळल्यामुळे तिने हे घर गहाण ठेवले असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता प्रियांकाने यावर प्रतिक्रिया देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

प्रियांकाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पाहिले तर ती कायमच या घरातील फोटो शेअर करताना दिसायची. पण गेल्या काही दिवसांपासून प्रियांकाने घरातील एकही फोटो शेअर केलेला नाही. या घरात गृहप्रवेश केल्यानंतर प्रियांकाने दिवाळी हा सण मोठ्या थाटामाट साजरा केला होता. होळीला जवळच्या मित्रपरिवाराला देखील या घरी बोलावले होते. स्विमिंगपूलमध्ये उड्या मारतानाचे फोटो तिने शेअर केले होते. आता प्रियांकाने हे घर सोडल्याचे समोर आले आहे.

प्रियांकाचे आगामी प्रोजेक्ट्स

प्रियांकाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर २०२३मध्ये तिचा 'लव अगेन' हा हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यापाठोपाठ आता तिचा 'हेड्स ऑफ स्टेट' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रियांका बॉलिवूडपासून लांब आहे. २०१९ साली ती 'द स्काय इज पिंक' या चित्रपटात दिसली होती. आता तिच्या बॉलिवूड चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत.

WhatsApp channel