बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून अभिनेत्री प्रियांका चोप्रा ओळखली जाते. प्रियांका कायमच तिच्या सिनेमा आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी प्रियांकाने रेड सी फिल्म फेस्टिव्हल २०२४ला हजेरी लावली. या फिल्म फेस्टिवलनंतर अभिनेत्री प्रियांका चोप्राने एटीव्ही बाईकवरून वाळवंटात आनंद घेतला आहे. तसेच ती पती निक जोनससोबत जेवणासाठी बाहेर गेली आहे. प्रियांकाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
प्रियांकाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत प्रियांका एटीव्ही बाईकवर दिसत आहे. या बाईक राइडसाठी प्रियांकाने पांढऱ्या रंगाचा शर्ट, त्याच्या आत पांढऱ्या रंगाची सँडो आणि खाली जीन्स घातली आहे. तसेच डोक्याला स्कार्फ बांधला आहे आणि सनग्लासेस लावले आहेत. या बाईक राइडचा प्रियांका मनसोक्त आनंद घेत असल्याचे दिसत आहे. पुढच्या फोटोत प्रियांका आणि निक जोनससोबत उंटाच्या शेजारी हसताना दिसत आहे. एका व्हिडिओमध्ये प्रियांका बाईकवर उभी असल्याचे दिसत आहे.
प्रियांका शेअर केलेल्या फोटोंमध्ये निक देखील दिसत आहे. निकने निळ्या रंगाचा सूट घातला आहे. त्याने त्यावर पांढऱ्या रंगाची टोपी घातली आहे आणि सनग्लासेस लावले आहेत. प्रियांकाने या पोस्टमध्ये काही सोलो फोटोदेखील शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये ते दोघे सौदी अरेबीयामधील लोकल फूडचा आनंद घेताना दिसत आहे. त्यांचे हे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
प्रियांकाने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. तिने या फोटोमध्ये लाल लाँग गाऊन परिधान केला आहे. तसेच त्यावर गळ्यात टाय आणि ब्रेझर जॅकेट म्हणून अडकवले आहेत. पण ही टाय आणि ब्लेझर निकचे असल्याचे दिसत आहे. पुढच्या फोटोमध्ये प्रियांकाचा ग्लॅमरस अंदाज दिसत आहे.
वाचा: महेश कोठारेंनी शरद तळवकरांना दिली होती 'धुमधडाका' सिनेमातून काढून टाकण्याची धमकी, काय होते कारण?
प्रियांकाला रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये मानद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सारा जेसिका पार्कर यांच्या हस्ते प्रियांकाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून प्रियांकाच्या कर्तृत्वाची दखल घेणे हा खरा सन्मान असल्याचे तिने म्हटले आहे. आपल्या भाषणात प्रियांकाने या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
संबंधित बातम्या