Priyanka Chopra Casting Couch Experience : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत मजल मारत तिने बराच मोठा पल्ला गाठला आहे. मात्र, या प्रवासात तिचा आत्मविश्वास मोडण्याचा प्रयत्न करणारे लोकही तिला भरपूर भेटले. खुद्द प्रियांकाने एका कार्यक्रमात याबद्दल काही गोष्टी सांगितल्या. यावेळी प्रियांकाने कास्टिंग काऊचचा अनुभव देखील शेअर केला.
फोर्ब्स पॉवर वुमन समिटमध्ये प्रियांका चोप्रा म्हणाली, 'मी त्यावेळी १९ वर्षांची होते. एका दिग्दर्शकाकडे कामासाठी बोलायला गेले होते. मी त्याला म्हणाले की, तुम्ही माझ्या स्टायलिस्टशी बोलाल का? तुम्हाला नेमकं काय हवंय ते सांगाल का? आणि मी तिथेच उभी होते. ती फोनवर माझ्या समोरच्या माझ्या स्टायलिस्टला म्हणाली की, 'ऐका, प्रियांकाने तिची पॅन्टी दाखवली तर लोक तिला पाहण्यासाठी सिनेमा बघायला येतील त्यामुळे तिची पॅन्टी खूप लहान द्या, जेणेकरून मला आणि लोकांना तिची पॅन्टी दिसेल.' समोर बसलेल्या लोकांना तुम्ही ओळखता का? त्यांना तिची पॅन्टी दिसली पाहिजे. ते एकदा नव्हे तर चार वेळा असे म्हणाले.
प्रियांका म्हणाली की, 'त्या रात्री घरी गेल्यावर मी आईला म्हणाले की, आई, मी त्या दिग्दर्शकाचा चेहरा पुन्हा पाहू शकणार नाही. जर तो माझ्याबद्दल असा विचार करत असेल, त्याला हे कळायला हवे की, मी अजून लहान आहे. आणि असे असेल तर मी पुढे जाऊ शकत नाही. त्यानंतर मी त्या चित्रपटातून माघार घेतली. त्या घटनेनंतर मी आजपर्यंत त्या दिग्दर्शकासोबत कधीच काम केलेलं नाही.’
प्रियांका म्हणाली की, 'मला काय व्हायचे आहे, ती माझी चॉइस असेल. मला कसे दिसायचे आहे ही माझी निवड असेल. तुमची विचारसरणी हीच तुमची ओळख आहे. या घटनेनंतर तिचे दिवंगत वडील अशोक चोप्रा आणि बॉलिवूड दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यामुळे तिचा आत्मविश्वास परत मिळाल्याचेही प्रियांकाने म्हटले. यानंतर प्रियांकाने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. केवळ बॉलिवूडच नव्हे, तर तिने हॉलिवूडमध्येही आपलं नाव गाजवलं. सध्या अभिनेत्री लग्न करून परदेशात स्थायिक झाली आहे. तर, हॉलिवूडमध्येही काम करत आहे.
संबंधित बातम्या