प्रियांकाला वयाच्या ७व्या वर्षी बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवल्याची खंत वाटते; मधु चोप्रा यांचे वक्तव्य
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  प्रियांकाला वयाच्या ७व्या वर्षी बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवल्याची खंत वाटते; मधु चोप्रा यांचे वक्तव्य

प्रियांकाला वयाच्या ७व्या वर्षी बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवल्याची खंत वाटते; मधु चोप्रा यांचे वक्तव्य

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 30, 2024 11:22 AM IST

मधु चोप्रा यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये मुलगी प्रियांका चोप्राला वयाच्या ७व्या वर्षी बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवल्याची खंत वाटत असल्याचे सांगितले.

Priyanka Chopra
Priyanka Chopra

बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून अभिनेत्री प्रियांका चोप्रा ओळखली जाते. प्रियांकाने अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये देखील स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. आज प्रियांकाचे करिअर यशाच्या शिखरावर असल्याचे पाहायला मिळते. पण प्रियांकाचे बालपण अतिशय खडतर होते. तिला वयाच्या ७व्या वर्षी बोर्डिंग स्कूलमध्ये टाकण्यात आले होते. आता प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये मुलीला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवल्याची खंत वाटते असे म्हटले आहे. तसेच तिचे ते दिवस आठवून मला आजही रडायला येते असे मधु यांनी म्हटले आहे.

मधु चोप्रा यांनी सांगितले बोर्डिंग स्कूलविषयी

मधु चोप्रा यांनी नुकताच रॉड्रिगो कॅनेलासला समथिंग बिग टॉक शो पॉडकास्टसाठी दिलेल्या मुलाखतीत प्रियांका विषयी अनेक खुलासे केले. या मुलाखतीमध्ये त्यांना मुलीला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवल्याचा पश्चाताप होत आहे. "मला माहित नाही, मी एक मतलबी आई होते का? याचा मला अजूनही पश्चाताप आहे. ते दिवस आठवून मला आजही रडायला येते. तो निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता. पण मी दर शनिवारी माझे काम सोडून ट्रेन पकडून तिला भेटायला जायचे. तिला तिच्या बोर्डिंग स्कूलशी जुळवून घेता येत नव्हते त्यामुळे दिवसेंदिवस सर्वच गोष्टी त्रासदायक होत चालल्या होत्या. शनिवारी ती माझ्या येण्याची वाट बघायची आणि मग रविवारी मी तिच्याकडेच थांबायचे. एक दिवस तिच्या शिक्षकांनी मला येऊ नका असे सांगितले" असे मधु चोप्रा म्हणाल्या.

निर्णयाचा पश्चाताप होत असल्याचे सांगितले

या मुलाखतीमध्ये मधु चोप्रा यांनी प्रियांकाला बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवण्याचा निर्णय चुकीचा ठरल्याचे सांगितले. 'हा एक खेदजनक निर्णय होता. पण एक प्रकारे हा निर्णय प्रियांकासाठी चांगला ठरला. तिला तिच्या पायावर उभे राहाता आले आहे' असे मधु म्हणाल्या.
वाचा: पदेशात स्थायिक झालेली माधुरी दीक्षित भारतात का परतली? अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा

प्रियांका आणि तिच्या आईबद्दल

प्रियांकाचे तिची आई मधूसोबत खूप जवळचे नाते आहे. आयुष्यातील प्रत्येक चढ-उताराच्या वेळी तिची आई तिच्यासोबत होती. तिची आई अनेकदा तिच्यासोबत शूटिंगला जाते. प्रियांकाने विजयसोबत तमिळ कोर्टरूम ड्रामा थामिझानमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिचा पहिला हिंदी चित्रपट अनिल शर्माचा द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय होता, ज्यात सनी देओल आणि प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत होते. आज प्रियांका एक ग्लोबल आयकॉन आहे. तिचे जगभरात चाहते आहेत.

Whats_app_banner