अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनास हा अमेरिकेतील प्रसिद्ध गायक आहे. निक जोनासने प्रथमच मुंबईत सध्या सुरू असलेल्या ‘लोल्लापालूजा’ या संगीत महोत्सवात आपलं गाणं सादर केलं. निक जोनास मंचावर आपलं गाणं गात असताना प्रेक्षकांमधून 'जिजू जिजू'च्या घोषणा झाल्या. आपल्या पतीचं अशा अनोख्या पद्धतीने स्वागत केल्याबद्दल अभिनेत्री प्रियांका चोप्रा अक्षरशः भावूक झाली होती. अमेरिकन पतीला जिजू म्हटल्याबद्दल प्रियांकाने मुंबईकरांचे आभार मानले आहे.
प्रियांका चोप्राने इन्स्टाग्रामच्या स्टोरीजवर पती निकच्या परफॉर्मन्सदरम्यान मुंबईकरांना ‘जिजू-जिजू’ (मेव्हणा) म्हणत असलेल्या गर्दीचा व्हिडिओ शेअर केला. त्यावर ‘धन्यवाद मुंबई’ लिहून इमोजी शेअर केल्या आहेत.
प्रियांका चोप्राचा पती आणि तिच्या दी जोनास ब्रदर्सचं भारतात प्रथमच सादरीकरण होतं. यावेळी प्रियांका मात्र अनुपस्थित होती. प्रियांका सध्या ‘हेड्स ऑफ स्टेट’ हा हॉलिवूड चित्रपट आणि 'जी ले जरा' या बॉलिवूड चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.
गायक निक जोनास, जो जोनास आणि केविन जोनास या तीन भावांचा समावेश 'जोनास ब्रदर्स' या रॉक संगीत बँडने असलेल्या मुंबईत शनिवारी रात्री एका संगीत संध्येमध्ये परफॉर्म केले. दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्वर आयोजित ‘लोल्लापालोजा इंडिया’ म्युझिक फेस्टिवलचे हे दुसरे वर्ष असून उदघाटनाच्या दिवशी या बँडने दीड तास सादरीकरण करून हजारो चाहत्यांना मंत्रमुग्ध केले होते.
बँडचे तिघे गायक मंचावर येण्यापूर्वी प्रियांका चोप्रा आणि रणवीर सिंग यांची भूमिका ‘दिल धडकने दो’ या चित्रपटातलं ‘गल्लन गुडियां…’ हे लोकप्रिय गाणं वाजवण्यात आलं होतं.
प्रियांका चोप्राचा पती निक जोनासने यावेळी भारताशी असलेल्या खास नात्याबद्दल भावना व्यक्त केल्या. ‘एक कुटुंब म्हणून आमचं भारताशी खोलवर नातं आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. आपण आजची रात्र ही आतापर्यंतची सर्वात रोमांचक संगीत संध्या बनवू’ असं निक जोनास बोलताच प्रेक्षकांमधून ‘जिजू, जिजू’चा जयघोष सुरू झाला. जोनास ब्रदर्सने यावेळी Celebrate, Sucker, What a Man Gotta Do, Close आणि Jealous हे गाणे सादर केले.
यावेळी निक जोनासने हिंदीत गाणाऱ्या रॅपर किंगसोबत ‘मान मेरी जान’ या गाणं सादर करून उपस्थित संगीतप्रेमींना आश्चर्याचा धक्का दिला.
संबंधित बातम्या