मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Priyanka Chopra: प्रियांका चोप्रावर आर्थिक संकट, गहाण ठेवला १४९ कोटी रुपये किंमत असलेला ‘हा’ बंगला?

Priyanka Chopra: प्रियांका चोप्रावर आर्थिक संकट, गहाण ठेवला १४९ कोटी रुपये किंमत असलेला ‘हा’ बंगला?

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 01, 2024 02:55 PM IST

Priyanka Chopra Financial Crisis: प्रियांका चोप्रावर आर्थिक संकट कोसळले असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत तिच्याकडून किंवा कुटुंबीयांकडून कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Priyanka Chopra And Nick Jonas
Priyanka Chopra And Nick Jonas

Priyanka Chopra And Nick Jonas: २ डिसेंबर २०१८ साली जोधपुरमधील उमेद भवन पॅलेसमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राने हॉलिवूड गायक निक जोनासशी लग्न केले. लग्नानंतर प्रियांका अमेरिकेत शिफ्ट झाली. सध्या हे कपल लॉस एंजलिसमध्ये आलिशान घरात राहात आहे. सोबतच त्यांची मुलगी आणि पाळीव श्वान देखील आहे. पण समोर आलेल्या माहितीनुसार, प्रियांकाने तिचे घर १४९ कोटी रुपयांचे घर गहाण ठेवले असल्याचे म्हटले जात आहे.

‘एनबीटी’ने दिलेल्या वृत्तानुसार प्रियांकाने २० मिलियन डॉलर किंमत असलेले म्हणजेच १४९ कोटी रुपयांचे लॉस एंजलिसमधील घर खाली केले आहे. प्रियांकावर आर्थिक संकट कोसळल्यामुळे तिने हे घर गहाण ठेवले असल्याचे म्हटले जात आहे. प्रियांकाला दर महिन्याला या घराचे १ लाख डॉलर इतकी रक्कम भरावी लागत होती. त्यामुळे तिने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. सध्या प्रियांकाला ही रक्कम भरणे थोडे कठीण झाल्यामुळे तिने हा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
वाचा: जगभरात 'फायटर'ची हवा! करणार २५० कोटी रुपयांचा पल्ला पार

प्रियांकाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पाहिले तर ती कायमच या घरातील फोटो शेअर करताना दिसायची. पण गेल्या काही दिवसांपासून प्रियांकाने घरातील एकही फोटो शेअर केलेला नाही. या घरात गृहप्रवेश केल्यानंतर प्रियांकाने दिवाळी हा सण मोठ्या थाटामाट साजरा केला होता. होळीला जवळच्या मित्रपरिवाराला देखील या घरी बोलावले होते. स्विमिंगपूलमध्ये उड्या मारतानाचे फोटो तिने शेअर केले होते. आता प्रियांकाने हे घर गहाण ठेवल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

५ जानेवारी २०२१ रोजी प्रियांकाने या घरात गृहप्रवेश केल्याचे इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सांगितले होते. तिने पती निक जोनाससोबत या घरातील पूजा केल्या होत्या. यावेळी प्रियांकाच्या देसी अवतारने सर्वांचे लक्ष वेधले होते. २०१९ पासून प्रियांका आणि निक नव्या घराचा शोध घेत होते. २०१९मध्ये तिने २० मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच १४९ कोटी रुपयांचे हे लॉस एंजलिसमधील घर खरेदी केले होते.

WhatsApp channel