Priya Berde: अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा कमबॅक, दिसणार 'या' चित्रपटात
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Priya Berde: अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा कमबॅक, दिसणार 'या' चित्रपटात

Priya Berde: अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा कमबॅक, दिसणार 'या' चित्रपटात

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 21, 2024 10:46 AM IST

Priya Berde Upcoming Movie: प्रिया बेर्डे या अभिनेत्री प्राजक्ता माळीसोबत स्क्रीन शेअर करणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Priya Berde Upcoming Movie
Priya Berde Upcoming Movie

Priya Berde Come back in Industry: मराठी चित्रपटसृष्टीमधील दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बर्डे यांची पत्नी अभिनेत्री प्रिया बर्डे यांनी एक काळ गाजवला होता. आजही त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्या लक्षात आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रिया या इंडस्ट्रीपासून लांब आहेत. आता त्या पुनरागमन करत असल्याचे समोर आले आहे. त्या प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटवलेली अभिनेत्री प्राजक्ता माळीने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून "भिशी मित्र मंडळ" या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. नुकतेच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुणे येथे सुरुवात झाली असून त्यामध्ये आता अजुन एका अभिनेत्रीची वर्णी लागली आहे आणि त्या अभिनेत्री म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे.
वाचा: अन्नू कपूरच्या भाकितानंतर झाले होते स्मिता पाटीलचे निधन, जाणून घ्या नेमके काय झाले होते

काय आहे चित्रपटाची कथा?

‘भिशी’ म्हटलं की डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं. ‘भिशी’च्या संकल्पनेत एका ग्रुपमधील सदस्य प्रत्येक महिन्याला ठराविक पैसे एकत्र करून ते टप्प्याटप्प्याने सर्वांना वापरण्यासाठी दिले जातात. साधारणत: प्रत्येक महिन्याला ग्रुपमधील एका सदस्याच्या घरी किंवा त्यांनी ठरवलेल्या एका ठिकाणी जमून, पैसे गोळा करून, काही चिठ्ठ्या उडवून त्यातून एक नाव निवडून त्या सदस्याला सगळे पैसे दिले जातात. भिशी हा प्रकार विशेषत: महिला, कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये अधिक प्रचलित आहे. याच ‘भिशी मित्र मंडळा’चं धमाल, कॉमेडी आणि निखळ मनोरंजक कथानक नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्राजक्तासोबत कोणत्या कलाकारांची वर्णी लागणार आहे, हे जाणून घेण्यासाठी आणखी थोडी वाट पहावी लागणार आहे.

कोणते कलाकार दिसणार चित्रपटात?

सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यानी आजवर अनेक चित्रपट,मालिकांमधून आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप त्यांनी उमटवली आहे. भिशी हा प्रकार विशेषत: महिला, कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये अधिक प्रचलित आहे. धमाल, कॉमेडी आणि निखळ मनोरंजक कथानक असलेल्या या "भिशी मित्र मंडळ" चित्रपटात प्राजक्तासोबत आता सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे झळकणार असून अजुन कोणते कलाकार झळकणार यासाठी अजुन थोडी वाट पहावी लागणार आहे. याबाबत माहिती समोर आलेली नाही.

Whats_app_banner