मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेली प्रिया बापट हिने आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. तिची चित्रपटांची निवड आणि पॉवर पॅक परफॉर्मन्समुळे ती नेहमीच चर्चेत असते. ‘काकस्पर्श’, ‘हॅपी जर्नी’ अशा कितीतरी दर्जेदार चित्रपटांमुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येत नेहमी वाढ होत असते. तिची सीटी ऑफ ड्रीम वेब सीरिज तर भलतीच गाजली आहे. आता प्रियाने तिच्या बोल्ड सीन्सवर प्रतिक्रिया दिली आहे.
प्रियाने नुकताच एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळी तिला सीटी ऑफ ड्रीम या वेब सीरिजमधील बोल्ड सीन विषयी विचारण्यात आले होते. त्यावर ती म्हणाली, “त्या बोल्ड सीनपासून ते आता मी ऑस्ट्रेलियात बिकिनी घालून फोटोशूट केलं तिथपर्यंत या काळात मला लोकांचे बरेच अनुभव आले. आमच्या प्रियाने असे नाही करायचे, आमची प्रिया साडीतच छान दिसते अशा अनेक प्रतिक्रिया मला ऐकायला मिळाल्या. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या त्या बोल्ड सीननंतर तर मला लोकांचे प्रचंड ऐकायला लागले होते.”
वाचा: मी जिवंत आहे; 'मदर इंडिया'मधील अभिनेत्याच्या निधनानंतर दिग्दर्शक साजिद खानचा व्हिडीओ व्हायरल
पुढे प्रिया वडिलांनी जेव्हा बोल्ड सीन पाहिला तेव्हा ते बोलले हे सांगताना म्हणाली, “‘सिटी ऑफ ड्रीम्स’ प्रदर्शित झाल्यावर ती क्लिप सगळीकडे व्हायरल होत होती. मला सुरुवातीला काहीच कल्पना नव्हती कारण, मी प्रमोशनमध्ये व्यग्र होते. मला ज्या क्षणी ती क्लिप दिसली, तेव्हा मी सगळ्यात आधी बाबांना फोन केला त्यांना सगळी कल्पना दिली. तुम्हाला माझी लाज नाही ना वाटत? असेही मी त्यांना विचारले. त्यावर माझ्या बाबांनी एका शब्दात मला उत्तर दिलेले, ते म्हणजे हा सगळा तुझ्या कामाचा एक भाग आहे. तू काम म्हणून हे स्वीकारलेस यात आम्हाला काहीच गैर वाटत नाही. तू दुर्लक्ष कर…विसरुन जा!”
नुकताच प्रियाने ऑस्ट्रेलियाला जाऊन बिकिनी शूट केले. त्याविषयी बोलताना म्हणाली, “ते फोटो माझ्या वडिलांनी पाहिले… त्यांचे काहीच म्हणणे नव्हते. मला असे वाटते आपण कलाकारांना आपल्याला हव्या त्या सोयीच्या साचात पाहत असतो आणि असे करणे योग्य नाही. बॉलीवूड-हॉलीवूड सिनेमामधील कलाकारांच्या भूमिकांना तुम्ही पात्र म्हणून बघता आणि हेच काम तुमच्या मराठी मुलीने केलं तर संस्कृती आड का येते? एका मराठी मुलीने साकारलेल्या पात्राचा अभिमान तुम्हाला का वाटत नाही? पण, अशा चर्चा तेवढ्या काळापुरत्याच होतात त्यानंतर होत नाही. कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचे हे आपल्या हातात असते.”
संबंधित बातम्या