Priya Bapat angry on audience: नाट्यगृहांची वाईट अवस्था यावर कलाकार नेहमीच व्यक्त होताना दिसतात. नेहमीच यावर वादंग माजताना दिसत. एकीकडे अनेक नवी नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर, दुसरीकडे मात्र नाट्यगृहांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. नाट्यगृहांच्या ता स्थितीला काही अंशी प्रेक्षक देखील जबाबदार आहेत. नुकतीच अभिनेत्री प्रिया बापट हिने एक पोस्ट शेअर करून आपला संताप व्यक्त केला आहे. प्रिया बापट आता प्रेक्षकांवर संतापली आहे.
नाट्यगृहांमध्ये भरपूर सुविधांची वानवा असते. तर, कधी अपुऱ्या सुविधांमुळे प्रेक्षक आणि कलाकार खूप वैतागलेले असतात. आता प्रिया बापट हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीमध्ये एका नाट्यगृहातील स्थिती पाहायला मिळत आहे. या नाट्यगृहात प्रेक्षकांच्या बसण्याच्या ठिकाणी कचरा पसरलेला दिसत आहे. हे दृश्य पाहून प्रिया बापट चांगलीच वैतागली आहे. तिने हा फोटो शेअर करताना लिहिले की, ‘नाट्यगृह स्वच्छ ठेवणे ही प्रेक्षकांचीही जबाबदारी आहे. कचरा कचरापेटीत टाकावा, नाट्यगृहात नाही. ही साधी गोष्ट आपल्याला कधी कळणार?’ असं म्हणून तिने आपला संताप व्यक्त केला आहे.
अभिनेत्री प्रिया बापट हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये नाट्यगृह दिसत असून, याच नाट्यगृहात प्रेक्षकांनी केलेला कचरादेखील पाहायला मिळत आहे. प्रिया बापट हिने स्टोरीवर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये पाण्याच्या बाटल्या, खाऊची पाकीटं, चहाचे कप आणि बाकी ही इतर कचरा पाहायला मिळत आहे. नाट्यगृहातील हे दृश्य पाहून प्रिया बापट चांगलीच संतापली आहे. तिने या सगळ्यासाठी प्रेक्षकांनाच जबाबदार ठरवले आहे. नाटक पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांचं हे वागणं बरोबर आहे का?, असा प्रश्न तिने सगळ्यांना केला आहे. प्रिया बापट हिने शेअर केलेल्या या फोटोमुळे आता चांगलीच चर्चा रंगली आहे.
प्रिया बापट सध्या नाटकांच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. तिने मराठी मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज तर गाजवल्याच, मात्र तिने हिंदीमध्ये आपलं नाव मोठं केलं आहे. ती अनेक हिंदी वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये देखील झळकली आहे. सध्या तिने ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक रंगभूमीवर सुरू आहे. याच नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रिया बापट हिला हा अनुभव आला आहे.