कार्तिकचा खरा चेहरा मुक्ता आणणार का सर्वांसमोर? प्रेमाची गोष्ट मालिकेत आजच्या भागात काय घडणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  कार्तिकचा खरा चेहरा मुक्ता आणणार का सर्वांसमोर? प्रेमाची गोष्ट मालिकेत आजच्या भागात काय घडणार?

कार्तिकचा खरा चेहरा मुक्ता आणणार का सर्वांसमोर? प्रेमाची गोष्ट मालिकेत आजच्या भागात काय घडणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Apr 05, 2024 01:44 PM IST

प्रेमाची गोष्ट मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. कार्तिक हा मुक्ता हिच्याशी चुकीच्या पद्धतीने वागत असतो. त्यामुळे मुक्ता त्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार का? हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

कार्तिकचा खरा चेहरा मुक्ता आणणार का सर्वांसमोर? प्रेमाची गोष्ट मालिकेत आजच्या भागात काय घडणार?
कार्तिकचा खरा चेहरा मुक्ता आणणार का सर्वांसमोर? प्रेमाची गोष्ट मालिकेत आजच्या भागात काय घडणार?

प्रेमाती गोष्ट या मालिकेत सध्या अतिशय वेगळे वळण आले आहे. सागर दुखावला गेल्यामुळे सतत मुक्ताची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. पण मुक्ता सागरशी बोलायला तयार नाही. ती खूप दुखावली गेली आहे. हे सगळं सुरु असताना इंद्रा देखील मुक्ताला सुनावत असते. पण यावेळी सागर मुक्ताची बाजू घेतो आणि इंद्रावर चिडतो. दुसरीकडे कार्तिकचा सतत मुक्ताच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो. आता मुक्ता त्याचा चेहरा सगळ्यांसमोर आणणार का हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत...

इंद्रा मुक्तावर रागावणार

इंद्रा ही सतत मुक्ताचा राग करत असते. ती सतत मुक्ताला घालून पाडून बोलच असते. मुक्ता तिच्या कामानिमित्त क्लिनिकला जाण्यासाठी निघते तेवढ्यात इंद्राला ते खटकते. सागरला बरे वाटत नसतानाही मुक्ता क्लिनिकला कशी जाते असा प्रश्न तिला पडतो. तेवढ्यात सागर मुक्ताची बाजू घेतो आणि तिला माझ्यासारखीच काम असतात. त्यामुळे तिला अडवायची गरज नाही असे म्हणतो. सागर मुक्ताच्या बाजूने बोलला कसा हे पाहून इंद्राला राग अनावर होतो. इंद्रा त्यावरूनही मुक्ताला सुनावते. मुक्ताला बोलण्याची एकही संधी इंद्रासोडत नसल्यामुळे सागर चिडतो. त्यांचे काम हे माझ्या कामा इतकेच महत्त्वाचे आहे असे सागर इंद्राला सुनावतो.
वाचा: २० वर्षांत बायकोला किती पैठण्या दिल्या?; आदेश बांदेकर यांनी दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

कार्तिकचे खरे रुप येणार समोर

कार्तिक हा सतत सासुरवाडीला येताना दिसतो. तो अतिशय साधा आणि सोज्ज्वळ असल्याचे सर्वांसमोर नाटक करत असतो. आता त्याचा खरा चेहरा सर्वांसमोर येणार आहे. त्याने मुक्ताच्या मैत्रिणीसोबत गैरवर्तन केलेले असते. ते मुक्ताला कळणार आहे. तसेच घरात असताना कार्तिक सतत मुक्ताला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असल्याने मुक्ताच्या मनात वेगळी भावने येते. त्याचे वागणे मुक्ताला पटत नाही. आता मुक्ता कार्तिकचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: मी जास्तीत जास्त २ हजार रुपये खर्च करते; कपड्यांवर वायफळ खर्च करण्यावर मृणाल ठाकूरची प्रतिक्रिया

सावनी हर्षवर्धनचा जळफळाट

सागरला प्रोजेक्ट मिळाल्याने कळताच सावनी-हर्षवर्धनचा जळफळाट होतो. हर्षवर्धन-सावनी हे सागरला प्रोजेक्ट कसा मिळाला याचा विचार करत असतात. पण, शेवटी कॉन्ट्रॅक्ट सागरच्या कंपनीला मिळतो. या प्रोजेक्टसाठी सावनी-हर्षवर्धनला सागरला फॉलो करण्याचा सल्ला वरुण देण्यात येतो. नाइलाजाने सावनी सागर सोबत काम करते. सागर पहाटे चार वाजता ऑफिसमध्ये मिटिंग ठेवतो आणि तिला येण्यास सांगतो.

Whats_app_banner