'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील कथा रुळावर असताना अचानक मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. आदित्य आणि सागरमधील संवाद ऐकून मुक्ता दुखावली गेली आहे. ती सागरशी बोलणे देखील टाळते आहे. सागर तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे जिच्यामुळे कार्तिकचा संसार वाचला आहे तिच्यावर कार्तिकची वाईट नजर असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच सावनी देखील सागरला उद्धवस्त करण्याचा प्लान आखत आहे. आता मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार चला जाणून घेऊया...
सागरला दुखापत झाली आहे. मुक्ता त्याच्याशी न बोलताच त्याची काळजी घेताना दिसते. पण या सगळ्या परिस्थितीला मुक्ताच जबाबदार असल्याचे इंद्राला वाटते. तू सागरसोबत भांडलीस म्हणून तो नाराज झाला आणि दारू प्यायला असे इंद्राला वाटते. सागरचे वडील इंद्राची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात आणि मुक्ताला धीर देत असतात. या सगळ्यात सागच्या मनात वेगळीच काळजी असते. तो मुक्ताला मनवण्यासाठी प्रयत्न करत असतो. माझ्यासोबत बोला, चिडा, ओरडा पण तुमची शांतता मला सहन होत नाही असे रडक्या आवाजात सागर म्हणाला. ते पाहून मुक्ताला वाईट वाटते पण ती सागरला माफ करत नाही. ती सागरचे कपडे बदलते, त्याला खायला भरवते. त्याची योग्य ती काळजी घेते.
वाचा: आनंदी-सार्थकचा पार पडणार विवाहसोहळा; ‘मन धागा धागा जोडते’मध्ये नवा ट्विस्ट
दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ताच्या टेबलवर सगळेजण एकत्र नाश्ता करत असतात. सागरची बहिण स्वाती आणि तिचा नवरा कार्तिक देखील तेथे आले असतात. सागरच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी ते तेथे आले असतात. स्वातीचा नवरा कार्तिक मुक्ताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तिच्या हातावर हात ठेवून तुम्हाला काही होणार नाही असे सांगतो. या सगळ्यात मुक्ताला वेगळे संकेत मिळतात. कार्तिक सतत जाणिवपूर्वक मुक्ताच्या जवळ जाण्याचा, स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. कार्तिकच्या मनात वाईट भावना असल्याचे मुक्ताला जाणवते.
वाचा: शाहरुखचा लेक ‘या’ परदेशी अभिनेत्रीला करतोय डेट? चर्चांना उधाण
हर्षवर्धन सावनीवर जास्तच नाराज असतो. कारण आदित्यने त्यांचा संपूर्ण प्लान धुळीस मिळवला आहे. हर्षवर्धन आणि सावनीने सागरविरोधात गोळा केलेले पेपर तो फाडून टाकतो. आदित्यने पेपर फाडल्याने सावनी हर्षवर्धनची माफी मागते. सागरला मी कायमचे उद्वस्त करणार असून सागरला आता जेलमध्ये जाणार असल्याचे सावनी सांगते. ते ऐकून हर्षवर्धन खूश होतो. आता खरच सावनीचा डाव यशस्वी होणार का? हे मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे.