मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मुक्ता करेल का सागरला माफ? काय घडणार 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागात

मुक्ता करेल का सागरला माफ? काय घडणार 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागात

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 02, 2024 01:57 PM IST

'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत आजच्या भागात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. जाणून घ्या काय घडणार आज?

मुक्ता करेल का सागला माफ? काय घडणार 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागात
मुक्ता करेल का सागला माफ? काय घडणार 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागात

गेल्या काही दिवसांपासून 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत एक वेगळ आले आहे. सागरला मुक्तावर असलेल्या प्रेमाची जाणिव झाली आहे. तो होळीच्या दिवशी मुक्तासमोर प्रेमाची कबुली देणार असतो. पण सावनी सागरच्या प्लानमध्ये व्यत्य आणते. ती आदित्यला मुक्ताविषयी भडकवून देण्याचा प्रयत्न करते आणि तो चिडतो. आता मालिकेत पुढे काय होणार चला जाणून घेऊया...

'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत होळीच्या दिवशी आदित्य सागरवर चिडतो. त्याला मुक्ता आवडत नाही असे तो बोलतो. त्यामुळे सागरने प्रेमाची कबुली देण्याचा निर्णय मागे घेतले. तो आदित्यला सांगतो हे सगळं केवळ फेक आहे. माझे मुक्तावर जराही प्रेम नाही. मी हे सगळे नाटक करत आहे. मुक्ता सागर आणि आदित्यमधील संवाद ऐकते. तिला चांगलाच धक्का बसतो. ती सागरसोबत असलेले नवरा-बायको हे नाते तोडण्याचा निर्णय घेते. ती केवळ सईची आई असल्याचे सागरला सांगते.
वाचा: संघर्षयोद्धा ते जुनं फर्निचर, एप्रिल महिन्यात मराठी चित्रपटांची मेजवानी

सागर मुक्ताच्या प्रेमात बुडालेला असतो. पण केवळ आदित्यला बरे वाटावे म्हणून तो मनाविरुद्ध त्याच्याशी बोलत असतो. पण मुक्ताला जेव्हा हे सगळे कळते तेव्हा ती दुखावली जाते. सागर मुक्ताची सतत माफी मागण्याचा प्रयत्न करतो. तिला परत पुन्हा पहिल्या पासून सुरुवात करण्यास तो विचारतो. मुक्ता मात्र सागरच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देत नाही. ती आपल्यात केवळ सईचे आई-बाबा हे नाते असल्याचे सांगते.
वाचा: एक दिवस अचानक मालिकेतून काढलं; ‘आई कुठे काय करते’मधील अभिनेत्रीचा खुलासा

मुक्ताच्या वागण्याने सागर हर्ट झालेला असतो. तो मुक्ताला मनवण्याचा प्रयत्न करतो पण मुक्ता काही ऐकायला तयार नाही. शेवटी रागाच्या भरात सागर घरातून बाहेर निघून जातो. तो दारु पितो आणि एका ठिकाणी फोनमध्ये असलेल्या मुक्ताचा फोटो पाहून बोलत असतो. तेवढ्यात काही गुंड तेथे येतात आणि त्याला ऐकवतात. ते मुक्ताविषयी बोलत असल्यामुळे सागरला प्रचंड राग येतो. तो त्यांच्याशी भांडण करतो. दरम्यान, त्यांच्यामध्ये झालेल्या मारामारीमध्ये सागरच्या हाताला चांगलेच लागते. आता मुक्ता सागरला माफ करणार का? दोघं पुन्हा नव्याने सुरुवात करणार का? हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point