सागर-मुक्ताची लव्हस्टोरी सुरु होण्याआधीच संपणार? काय घडणार आजच्या भागात
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सागर-मुक्ताची लव्हस्टोरी सुरु होण्याआधीच संपणार? काय घडणार आजच्या भागात

सागर-मुक्ताची लव्हस्टोरी सुरु होण्याआधीच संपणार? काय घडणार आजच्या भागात

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 27, 2024 02:59 PM IST

प्रेमाची गोष्ट मालिकेत सागर आणि मुक्तामध्ये चांगले नाते निर्माण होत असल्याचे दिसत आहे. अशातच सावनी त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

सागर-मुक्ताची लव्हस्टोरी सुरु होण्याआधीच संपणार? काय घडणार आजच्या भागात
सागर-मुक्ताची लव्हस्टोरी सुरु होण्याआधीच संपणार? काय घडणार आजच्या भागात

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेत सागर आणि मुक्ता एकमेकांच्या प्रेमात पडत असल्याचे दिसत आहे. पण सावनीला हे बघवत नाही. ती आदित्यचा वापर करुन सागर आणि मुक्ताच्या नात्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आता मालिकेच्या आगामी भागात होणार हे जाणून घ्या...

धुळवडीच्या निमित्ताने सागर-मुक्ताच्या आयुष्यात नवे रंग भरले जात असल्याचे दिसत आहे. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पण सावनीला मात्र हे मान्य नाही. ती पुन्हा एकदा आदित्यचा वापर करुन त्यांच्या नात्याचा बेरंग करणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
वाचा: ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमासाठी प्रविण तरडेची खास पोस्ट

प्रेमाची गोष्ट मालिकेत सध्या आदित्य मुक्ता आईकडे म्हणजेच माधवी गोखलेंकडे त्याच्या कॉउन्सलिंगसाठी जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यावेळी मुक्ता आदित्यच्या मनात सागरविषयीच्या गोड आठवणी पुन्हा जाग्या करताना दिसते. पण सावनीला हे कळते आणि ती आदित्यसमोर मुक्ताच्या खऱ्या भावना समोर आणते. त्यामुळे पुन्हा एकदा मुक्ता आदित्यच्या मनातून उतरते आणि तो मुक्ताला वर चिडतो. तिला काही गोष्टी मोठ्या आवाजात बोलून ऐकवतो. पण कोळी कुटुंबीय मुक्ताकडे होळीसाठी आदित्यला आणण्याचा आग्रह करतात.
वाचा: कौतुकास्पद! रितेश देशमुखची मुले फुटबॉल खेळण्यासाठी परदेशात

दरम्यान, होळीला जेव्हा आदित्य घरी येतो तेव्हा कोळी कुटुंबातील सगळ्यांनाच आनंद होतो. दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळवडीच्या दिवशी सागर मुक्तासमोर प्रेमाची कबुली देतो. त्यावेळी सावनी पुन्हा एकदा सागर आणि मुक्ताच्या नात्याविषयी आदित्यच्या मनात विष कालवते. त्यामुळे आदित्यचा राग अनावर होतो. जेव्हा सागर मुक्ताशी बोलत असतो, तिच्यासमोर प्रेमाची कबुली देते तेव्हा सावनी या क्षणाचा फायदा घेते. ती आदित्यला सांगते की, तुझा पप्पा तुला विसरला आहे. तो त्याच्या दुसऱ्या बायकोसोबत खूश आहे. ते ऐकून आदित्यच्या मनात मुक्ताविषयी पुन्हा राग निर्माण होतो.

Whats_app_banner