छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'प्रेमाची गोष्ट' पाहिली जाते. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतान मालिकेतील मुक्ता म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधानने मालिका सोडली. तिच्या या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला. आता तिने मालिका सोडल्यानंतर तिच्या जवळची मैत्रीण अपूर्णा नेमळेकरला सोशल मीडियावर अनफॉलो केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तेजश्रीच्या मालिका सोडण्याला अपूर्वा कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत अपूर्वा नेमळेकरने सावनीची भूमिका साकारली आहे. अपूर्वाची ही भूमिका खलनायिकेची आहे. त्यामुळे मालिकेत अनेकदा सावनी आणि मुक्ता यांच्यामध्ये भांडणं दाखवली गेली आहेत. मात्र आता खऱ्या आयुष्यातसुद्धा तेजश्री आणि अपूर्वा एकमेकांच्या वैरी झाल्या आहेत का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. यामागचं कारण म्हणजे तेजश्री आणि अपूर्वाने एकमेकींना इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अनफॉलो केले आहे. इतकंच नव्हे तर दोघी एकत्र दुबईला फिरायला गेल्या होत्या. त्या ट्रिपचे फोटोसुद्धा दोघींनी इन्स्टाग्रामवरून काढून टाकले आहेत. म्हणूनच तेजश्रीने अपूर्वासोबतच्या वादामुळे मालिका सोडली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वाचा: रिया चक्रवर्तीने वाचवले एका महिलेचा जीव, तुरूंगातून बाहेर येताच तिने मानले आभार
'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडल्यानंतर तेजश्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट शेअर करत तिने, ‘चिअर्स.. कधीकधी तुम्हाला बाहेर पडावं लागतं. तुमचं महत्त्व जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्त्वाचा आदर करा. कारण तुमच्यासाठी ते इतर कोणीही करणार नाही’ असे कॅप्शन दिले आहे. दरम्यान ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत आता तेजश्रीची जागा अभिनेत्री स्वरदा ठिगळेनं घेतली आहे. मात्र स्वरदाला प्रेक्षकांकडून नकारात्मक प्रतिक्रियांचा सामना करावा लागतोय.
संबंधित बातम्या