मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सावनीचा अंहकार इंद्रा मोडणार, काय घडणार 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आजच्या भागात वाचा

सावनीचा अंहकार इंद्रा मोडणार, काय घडणार 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आजच्या भागात वाचा

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 09, 2024 04:06 PM IST

'प्रेमाची गोष्ट' ही मालिका सध्या वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. मालिकेत सावनीला सागरच्या सुपरव्हिजन खाली सगळ्या गोष्टी कराव्या लागत आहेत. त्यामुळे तिचा जळफळाट होत आहे. आता इंद्रा देखील सावनीला चांगलाच धडा शिकवणार आहे.

सावनीचा अंहकार इंद्रा मोडणार, काय घडणार 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आजच्या भागात वाचा
सावनीचा अंहकार इंद्रा मोडणार, काय घडणार 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आजच्या भागात वाचा

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मालिकेत आजच्या भागात इंद्रा सावनीची चांगलीच शाळा घेताना दिसणार आहे. सतत वाटेल तसं वागणाऱ्या सावनीला इंद्रा चांगलाच धडा शिकवणार आहे. सावनीला सागरच्या सुपरव्हिजन खाली सगळ्या गोष्टी कराव्या लागत आहेत. त्यामुळे तिचा जळफळाट होत आहे. ती एका पेपरवर सागरच्या सह्या घेण्यासाठी आली आहे. पण सागर तिला अगदी सहज सही देण्यास तयार नसतो.

ट्रेंडिंग न्यूज

प्रोजेक्ट पेपरवर सही घेण्यासाठी सावनी सागरच्या घरी येते. पण, इंद्रा तिला घरात घेण्यास नकार देते. त्यावर माझ्यासाठी ह्या पेपरवर सागरने सह्या करणे गरजेचे आहे हे सावनी सांगत असते. त्या पेपरवर सही मिळवण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे असे ती म्हणते. त्यावर सागर इंद्राला सूचकपणे सावनी काहीही करायला तयार आहे असे सांगतो. इंद्रा सावनीला घरकाम करायला लावते. सावनी त्यावर नाराजी व्यक्त मी ही कामे करणार नाही असे स्पष्ट करते. पण नाईलाजाने तिला इंद्राचे ऐकावे लागते. इंद्रा सावनीला लादी पुसण्यासाठी सांगते. सावनी लादी पुसत असताना इंद्रा तिला जाणीवपूर्वक त्रास देताना दिसते. सावनीने दिलेल्या मनस्तापाचा बदला इंद्रा घेत असते.
वाचा: 'ए भीडू' म्हणत अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी चाहत्याच्या मारली टपलीत, पाहा मजेशीर व्हिडीओ

इंद्राने सुनावले सावनीला

मला घरकामगार करायला लावल्याचा हिशोब चुकता करणार असल्याचे सावनी मनोमनी ठरवते. तर, सागर मुक्ताला सुनावताना तुला ज्या भाषेत समजते त्याच भाषेत तुला उत्तर दिले असल्याचे ती सांगतो. तू इतरांचा अपमान करत आली आहेस, त्यांना मनस्ताप दिला आहे. त्यामुळे तुझ्याच भाषेत मी तुला उत्तर दिले आहे असे इंद्रा म्हणते.
वाचा: रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या आणि धनुष यांचा अखेर घटस्फोट होणार, चैन्नई कोर्टात अर्ज दाखल

लकीचे बिंग फुटले

लकीचा एमबीची रिझल्य मुक्ताच्या हाती लागतो. ती लकीला हे सगळं करण्याचा जाब विचारते. त्यावर लकी काहीच उत्तर देत नाही. त्यानंतर मुक्ता त्याला २४ तासांचा अवधी देते. या काळात घरातल्यांना खरे सांगून टाक असे ती म्हणत असते. पण लकी आणखी नवे नाटक सुरु करतो. तो एक नवा ड्रामा क्रिएट करतो. मुक्ता देखील या सगळ्यातून लकीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणते. आपल्या मित्रांनी पार्टी हवी म्हणून माझ्यासोबत मस्करी केली असल्याचे लकी सांगत असतो. तो एका मित्राला सोबतही घेऊन येतो. पण मुक्ता सत्य सर्वांसमोर सागंते.
वाचा: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लढणार लोकसभा निवडणूक? स्वत: प्रतिक्रिया देत केला खुलासा

IPL_Entry_Point

विभाग