मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सावनीमुळे मोडला मिहिर आणि मिहिकाचा साखरपुडा, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आजच्या भागात काय घडणार?

सावनीमुळे मोडला मिहिर आणि मिहिकाचा साखरपुडा, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आजच्या भागात काय घडणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
May 08, 2024 01:05 PM IST

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत गेल्या काही दिवसांपासून मिहिर आणि मिहिकाच्या साखरपुड्याची तयारी सुरु होती. पण आता सावनीमुळे त्यांचा साखरपुडा मोडला आहे.

सावनीमुळे मोडला मिहर आणि मिहिकाचा साखरपुडा, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आजच्या भागात काय घडणार?
सावनीमुळे मोडला मिहर आणि मिहिकाचा साखरपुडा, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आजच्या भागात काय घडणार?

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत गेल्या काही दिवसांपासून मिहिर आणि मिहिकाच्या साखरपुड्याची तयारी करण्यात आली. त्यासाठी सर्वजण जय्यत तयारी करत होते. पण अचानक सावनी तेथे येते आणि सर्वकाही बदलते. ती मिहिरची बहिण असल्याचा गौप्यस्फोट होतो. त्यामुळे माधवीने या साखरपुड्याला नकार दिला आहे. आता सागर आणि मुक्ता काय नवा मार्ग काढणार हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही सावनी मिहिका आणि मिहिरच्या साखरपुड्याला येऊन गोंधळ घालण्यापासून होते. मी मिहिरची बहिण आहे. या साखरपुड्याला येणे हा माझा हक्क आहे असे ती बोलते. पण मिहिर तिला तेथून सर्वांसमोर हकलून देताना दिसतो. त्यामुळे आता सागर आणि मुक्तासमोर मोठे आव्हान उभे आहे.
वाचा: बॉबी देओल आधी 'या' अभिनेत्रीने डोक्यावर दारुचा ग्लास ठेवून केला 'जमाल कडू' डान्स, वर्षांनी व्हिडीओ व्हायरल

माधवनी दिले साखरपुड्याला नकार

मिहिर हा सावनीचा भाऊ आहे हे कळताच माधवी सगळ्यांसमोर आम्हाला हे नातं मान्य नाही असे बोलून सर्वांचे आभाप मानून तेथून निघून जाते. मुक्ता आणि सागर माधवीची समजूत घालण्याचा प्रयत्न करत असतात. पण माधवी कोणाचेही ऐकून घ्यायला तयार नसते. हा माझ्या भावासारखा आहे. सावनी आणि त्याच्या स्वभावात खूप फरक असे बोलून सागर माधवीला समजावण्याचा प्रयत्न करतो. पुरु देखील तिची समजूत घालतो. पण माधवी कोणाचे ऐकायला तयार नसते.
वाचा: लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सुनिधी चौहानवर चाहत्याने फेकली पाण्याची बाटली, गायिकेने व्यक्त केला संताप

इंद्राने माधवीवरुन सर्वांना सुनावले

माधवी साखरपुडा मोडते आणि घरी निघून जाते. तेवढ्यात इंद्रा स्पष्ट बोलते की ती कोणाचे ऐकणार नाही. आमच्या मुलाला नकार द्यायला त्यात काय कमतरता होती, तुझ्या बहिणीलादेखील तिच्या गुण-दोषासह स्वीकारणार होतो ना? असे इंद्रा मुक्ताला सुनावते. ती बाई कोणाचं ऐकणार नाही असे देखील इंद्रा सांगते. त्यानंतर बापू इंद्राची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात.
वाचा: मुंबईत मराठी माणूस चालणार नाही?; दिग्दर्शक अक्षय इंडिकर याची संतप्त पोस्ट व्हायरल

सावनीने व्यक्त केला संताप

मिहिरचा साखरपुडा हा मिहिकाशी कसा होतो तेच बघते असे बोलून सावनी कोळी कुटुंबाकडे गेलेली असते. ती भर साखरपुड्यात येऊन मी मिहिरची बहिण आहे आणि मला हा साखरपुडा मान्य नाही असे बोलते. मिहिर तिला तेथून हकलून देतो. मिहिरने तिला हकलून दिल्यामुळे सावनीला प्रचंड राग येतो. हे सगळे मुक्तामुळे होत आहे असे ती बोलताना दिसते. मी मुक्ताचा बदला घेईन असे देखील ती बोलते. आता आगामी भागात सावनी काय नवा डाव आखणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

IPL_Entry_Point