'प्रेमाची गोष्ट' मालिकेत गेल्या काही दिवसांपासून सावनी आणि हर्षवर्धनच्या लग्नाची तयारी सुरु आहे. हर्षवर्धनला जरी हे लग्न करायचे नसले तरी देखील तो सध्या सर्व तयारी करताना दिसत आहे. तो लग्नाच्या मांडवात काय घोळ घालणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. आता मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार चला जाणून घेऊया...
मिहिकावर हर्षवर्धन आणि सावनीच्या लग्नाच्या सर्व कार्यक्रमांची जबाबदारी असते. ती सगळे कार्यक्रम योग्य पद्धतीने कसे पार पडतील याकडे लक्ष घालत असते. त्यात दोघांच्याही बॅचलर पार्टीचे नियोजन देखील तिच्याकडे असते. हर्षवर्धनची पार्टीला मिहिरने जाऊ नये अशी मिहिकाची इच्छा असते. सुरुवातीला मिहिर तिची मजा घेतो. पण नंतर तो जाणार नसल्याचे सांगतो.
वाचा: अनंत अंबानीच्या संगीत सोहळ्यात सलमान खानचा स्वॅग, पाहा व्हिडीओ
सावनी हर्षवर्धनशी लग्न करत असल्यामुळे आदित्यला काळजी वाटत असते. तो अचानक हर्षवर्धनच्या घरी निघून जातो. तेथे गेल्यावर तो हर्षवर्धनला प्रश्न विचारतो की माझ्या मम्माला तुम्ही आनंदी ठेवाल ना. त्यावर हर्षवर्धन गोड बोलून आदित्यला चुकीचे काम करण्यास भाग पाडतो. तो मुक्ताला बॅचलर पार्टीस येण्यास भाग आणि तिला चुकीचा पत्ता दे हे आदित्यला सांगतो. तो देखील त्याने सांगितल्याप्रमाणे वागतो.
वाचा: कालीन भैय्या सर्वात महाग! 'मिर्झापूर'साठी कोणत्या कलाकाराने किती मानधन घेतले?
हर्षवर्धनता मुक्ताचा बदला घ्यायचा असतो. त्यामुळे तो मुक्ताला चुकीचा पत्ता देऊन बॅचलर पार्टीचे आमंत्रण देतो. या पार्टीत सर्वज मुले असतात. मुक्ता तेथे पोहोचते आणि सावनीला शोधत असते. पण सावनीमात्र कुठेही दिसत नाही. एक मुलगा तेथे येऊन मुक्ताला नाचण्यास सांगतो.
वाचा: अशोक सराफ आणि माधव अभ्यंकरची होणार टक्कर, 'लाईफलाईन' सिनेमातील अण्णांचा लूक व्हायरल
मुक्ता नटूनथटून पार्टीला गेली असते. पण ती आदित्यमुळे चुकीच्या पार्टीमध्ये पोहोचते. मुक्ता तेथे पोहोचल्यावर सर्वजण तिच्याभोवती उभे राहतात. मुक्ताला नाचायला सांगतात. मुक्ताला ते पाहून रडू कोसळते. तेवढ्यात सागर तेथे पोहोचतो. सर्वांना तो लांब व्हायला सांगतो. तसेच या मॅडमचा नवरा इथे आला आहे. त्यामुळे सर्वांनी लांब रहा असे तो सांगतो. आता मालिकेच्या पुढच्या भागात काय घडणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या