'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ता आणि सावनी या दोघीही सागरच्या बायका आहेत. सावनीला सागरने घटस्फोट दिला असला तरी आदित्यसोबत सध्या ती सागरच्या घरात राहात आहे. सावनीकडे पैसेच नाहीत त्यामुळे ती सागरकडे राहात आहे. पण तरीही सावनी सुधारत नाही. ती सतत काही ना काही करत असते. आता सागर आणि मुक्ताचा रोमॅन्स पाहून सावनीचा जळफळाट झाला आहे. वाचा आजच्या भागात काय होणार...
रात्री आदित्य खूप घाबरतो. त्याला सतत भीती वाटते की मुक्ता त्याला घरातून बाहेर काढेल. मुक्ता आदित्यची ही अवस्था पाहाते. ती आदित्यला जवळ घेते आणि सागरसोबत झोपायला सांगते. आदित्य देखील शांत होतो आणि झोपतो. रात्रीच्या तणावामुळे आदित्य रात्री झोपेत बेडवर सू करतो. सकाळी उठल्यावर ते पाहून तो घाबरतो. त्याला सुचत नाही काय करावे. आता हे पाहिल्यावर मुक्ता त्याला घरातून बाहेर काढणार असे वाटू लागते. त्यामुळे तो आणखीच घाबरतो.
कोणाला कळू नये म्हणून आदित्य बेडवरची बेडशीट काढतो आणि ती धुण्यासाठी बाथरुममध्ये जातो. तसेच बेडवर पावडर टाकून सर्वकाही स्वच्छ करतो. मुक्ता आदित्यला उठवायला खोलीत येते. तेव्हा तिला बाथरुम मधून आवाज येतो. ती आदित्यला विचारते तेव्हा आदित्य तिच्यावर चिडतो. शेवटी मुक्ता आदित्यला बाथरुमचे दार उघडायला लावते. तिला दिसते की आदित्य बेडशीट धूत असतो. मुक्ताला ते पाहून काळजी वाटू लागते. आदित्य खूप तणावात असल्याचे तिला जाणवते.
वाचा: जॉन अब्राहमनं घेतली ऑलिम्पिक पदक विजेत्या मनू भाकर हिची भेट! फोटो पाहून नेटकरी संतापले, काय आहे कारण?
मुक्ता ज्या प्रकारे सर्वांची काळजी घेते ते पाहून सागरला प्रचंड कौतुक वाटते. मुक्ता स्वयंपाक घरात काम करत असताना सागर तेथे येतो. तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. मुक्ता लाजते. त्या दोघांचा रोमान्स सावनी पाहाते. ते पाहून सावनीचा जळफळाट होतो. मी त्या मुक्ताला सोडणार नाही, सगळे तिला फार महत्त्व देतात वैगरे वैगरे सावनी बोलत असते. आता सावनी कोणता नवा डाव आखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मालिकेच्या आगामी भागात मुक्ता आदित्यच्या मानात स्वत:ची जगा निर्माण करणार का? हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.