कार्तिक घेणार का जावई असण्याचा फायदा? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काय असणार मुक्ताचे पुढचे पाऊल-premachi goshta serial 4th april 2024 update ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  कार्तिक घेणार का जावई असण्याचा फायदा? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काय असणार मुक्ताचे पुढचे पाऊल

कार्तिक घेणार का जावई असण्याचा फायदा? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काय असणार मुक्ताचे पुढचे पाऊल

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 04, 2024 02:49 PM IST

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. कार्तिक हा मुक्ता हिच्याशी चुकीच्या पद्धतीने वागत असल्याचे दिसत आहे. आजच्या भागात काय घडणार जाणून घ्या...

कार्तिक घेणार का जावई असण्याचा फायदा? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवे वळण
कार्तिक घेणार का जावई असण्याचा फायदा? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवे वळण

प्रेमाती गोष्ट या मालिकेत सागर सध्या दुखावलेल्या मुक्ताची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. पण मुक्ता काही सागरला उत्तर देत नाही. ती प्रचंड दुखावली गेली आहे. हे सगळं करत असताना इंद्रा देखील मुक्ताला सुनावत असते. पण यावेळी सागर इंद्रावर चिडतो. दुसरीकडे कार्तिकचा खरा चेहरा मुक्तासमोर येतो. आता आजच्या भागात नेमके काय घडणार चला जाणून घेऊया...

सागरचे प्रयत्न सुरूच...

सागर मुक्ताची समजूत काढण्याचा सतत प्रयत्न करत असतो. मात्र, नाराज असलेली मुक्ता सागरच्या कोणत्याच कृतीवर प्रतिक्रिया देत नाही. मी तुमची बायको आहे, हीच माझ्यासाठी शिक्षा आहे असे मुक्ता म्हणते. तुम्हाला नफा कुठे आहे हे सगळे कळतं. मला माझं आयुष्य जगू द्या, एवढे उपकार करा असे मुक्ता चिडून म्हणते. सागर-मुक्ताचे बोलणे सुरू असताना दुसरीकडे सई येते आणि सागरला स्वत: बनवलेले ग्रीटिंग कार्ड देते. सईचे कारण काढून जवळ येऊ नका असेही मुक्ता सागरला बजावते.
वाचा: ‘या’ सेलिब्रिटीने घेतलं ईशा अंबानी-आनंद पिरामल याचं अमेरिकेतील घर, ५०० कोटी रुपयांचा केला करार

इंद्रा मुक्तावर पुन्हा चिडणार

इंद्राला मुक्तावर चिडण्यासाठी कारण लागत नाही. ती सतत मुक्ताचा उद्धार करत असते. मुक्ता आपल्या अपॉईंटमेंटसाठी क्लिनिकला जाण्यासाठी निघत असते तेवढ्यात इंद्राला ही बाब खटकते. सागरला बरे वाटत नसतानाही क्लिनिकला कशी जाते असा प्रश्न ती मुक्ताला विचारते. तर, दुसरीकडे सागर मुक्ताची बाजू घेतो आणि तिला माझ्यासारखीच काम असतात. त्यामुळे तिला अडवू नको असे सांगतो. सागर मुक्ताची बाजू घेत असल्याचे पाहून इंद्राला राग येतो. इंद्रा त्यावरूनही मुक्ताला बोलते. मुक्ताला वारंवार इंद्रा बोलत असते त्यामुळे सागर चिडतो. त्यांचे काम आणि माझ्या कामा इतकेच महत्त्वाचे असते असे सागर इंद्राला सुनावतो.
वाचा: पत्नीच्या त्रासाला कंटाळून शेफ कुणाल कपूर याने घेतला घटस्फोट, १६ वर्षांचा संसार मोडला

कार्तिकचे खरं रुप येणार समोर

कार्तिक हा सतत सागरच्या घरी येताना दिसत आहे. तो अतिशय साधा आणि सोज्ज्वळ असल्याचे नाटक सर्वांसमोर करत असतो. पण मुक्ताच्या मैत्रिणीसोबत त्याने केलेला गैरव्यवहाराविषयी मुक्ताला कळाले आहे. तसेच घरात असताना कार्तिक सतत मुक्ताला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचे वागणे मुक्ताला पटत नाही. आता मुक्ता कार्तिकचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.