मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

Aarti Vilas Borade HT Marathi
May 03, 2024 10:40 AM IST

'प्रेमाची गोष्ट' मालिका सध्या वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये जवळीक निर्माण होत असल्याचे दिसत आहे.

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा
सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत अखेर मुक्ता आणि सागरला एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत मुक्ता आणि सागरची भांडणे होत आहेत. आता त्यांच्यामधील भांडण थांबले असून दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचे पाहायला मिळत आहे. दोघांचा रोमॅन्स सुरु आहे. इंद्राला त्या दोघांचे जवळ येणे पट नसले तरी सागर मुक्ताची काळजी घेत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुक्ताला झाली अॅलर्जी

स्वाती कार्तिकचा बदला घेण्यासाठी मुक्ताचा चहामध्ये काही तरी मिसळते. त्यामुळे मुक्ताच्या संपूर्ण शरीवार अॅलर्जी उठते. मुक्ताला नेमकं काय झालं हेच कळत नाही. शेवटी ती डॉक्टरांकडे जाण्याचे ठरवते. मिहिर तिच्यासोबत दवाखान्यात जातो. ही केवळ अॅलर्जी असल्याचे डॉक्टर सांगतात. पण मुक्ताला प्रश्न पडतो की हे नेमकं कशामुळे झाले आहे.
वाचा: 'तिकडे वडिलांना अग्नी देत होते आणि मी हास्यजत्रेच्या खूर्चीत', प्रसाद ओकने सांगितला धक्कादायक अनुभव

आदित्य आला कोळी कुटुंबीयांकडे

सावनीने आदित्यला खोटो प्रोजेक्ट दिल्याचे सांगते. त्यामुळे सागरसोबत वेळ घालवण्यासाठी तो कोळी कुटुंबीयांकडे येतो. सागर मुक्ताला घेऊन डॉक्टरांकडे जातच असतो तेवढ्यात आदित्य तेथे येतो. त्याला पाहून मुक्ता एकटी दवाखान्यात जाते. ती सागरला तेथेच थांबण्यास सांगते. आदित्य आल्यामुळे इंद्रा मासे बनवते. त्याला गोडधोड खायला घालते. सगळेजण त्याच्यासोबत वेळ घालवतात. नंतर सागर आदित्यला सोडून येतो.
वाचा: 'तुला पाहते रे' मालिकेतील अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर पुनरागम, नवा प्रोमो प्रदर्शित

इंद्राने केली मुक्ताला विनंती

स्वातीला कार्तिकची आठवण येते. त्याच्या शर्टची घडा घालताना तिला अश्रू अनावर होतात. इंद्रा ते पाहाते आणि मुक्ताच्या खोलीत जाते. इंद्रा मुक्ताला कार्तिकची माफी मागण्याची विनंती करते. पण मुक्ता सगळ्याला नकार देते. उलट कार्तिक पुन्हा बाहेर आल्यावर एखाद्या मुलीशी असेच वागेल असे मुक्ता बोलतो. इंद्रा पुन्हा मुक्तालाच दोषी मानते. तसेच या सगळ्याचा योग्य वेळ आली की बदला घेईन असे बोलून निघून जाते.
Heeramandi Review: अंगावर शहारे आणणारी सीरिज! संजीदा शेख सोनाक्षी सिन्हा हिचावर भारी

सावनीने भरले आदित्यचे कान

आदित्य घरी जातो आणि सावनीला सांगतो की ती जो विचार करत होती तो चुकीचा होता. सागर सगळं सोडून आदित्यसोबत वेळ घालवत होता. सावनी या सगळ्यावर आदित्यला सांगते की तुझ्या सागर पप्पांना मुक्ताला घटस्फोट द्यायला सांग. मग आपण चौघे पुन्हा एकत्र राहू. तू, मी, सई आणि पप्पा. मी हवं तर हर्षवर्धनला सोडून देते. ते ऐकून आदित्या खूश होतो. आता आदित्य मालिकेत पुढे काय करणार हे येत्या भागात कळेल.

IPL_Entry_Point