मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  स्वातीवरुन सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये जोरदार भांडण, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?

स्वातीवरुन सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये जोरदार भांडण, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 30, 2024 11:46 AM IST

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये झालेल्या भांडणाचा सावनी फायदा घेणार आहे. तिची आता पुढची चाल काय असणार हे 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील आजच्या भागात कळणार आहे.

स्वातीवरुन सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये जोरदार भांडण, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?
स्वातीवरुन सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये जोरदार भांडण, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत कार्तिकला तुरुंगात टाकल्यापासून सागर आणि मुक्ताचे नाते चांगले झाल्याचे दिसत आहे. तसेच कोळी कुटुंबीय आनंदात एकत्र आल्याचे दिसत आहे. सर्वांनी आनंदाने मुक्ताचे स्वागत केले आहे. स्वाती वर वर चांगुलपणाचा आव आणत असली तरी आतून ती मुक्ताविरोधात कट रचताना दिसत आहे. या सगळ्याचा परिणाम मुक्ता आणि सागरच्या नात्यावर होणार हे आगामी भागात कळणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सागर मुक्तामध्ये भांडण

मुक्ताचे कोळी कुटुंबीयांनी स्वागत केल्यानंतर स्वाती मुक्ताची माफी मागते. त्यानंतर सर्वजण एकत्र बसू खेळ खेळतात. या खेळात सागरने मुक्तावर विश्वास असल्याचे दाखवले आहे. तर दुसरीकडे तिला साथ दिली यासाठी मुक्ता सागरचे सगळ्यांसमोर आभार मानते. गेम संपल्यानंतर सगळे आपल्यापल्या बेडरुममध्ये आराम करण्यास जातात. कार्तिक चुकीचा वागला असला तरी मुक्ताला सतत स्वातीची काळजी वाटते. ती स्वातीच्या केवळ भल्याचा विचार करत असते. तिने स्वत:च्या पायावर उभे राहावे, समाजात स्वाभिमानाने जगावे असे तिला कायम वाटत असते. पण सागरचे यावर वेगळे मत असते. 'माझ्या बहिणीला कसे सांभाळायचे आहे, ते मी आमचं आम्ही पाहून घेऊ तुम्ही मध्ये पडू नका' असे सागर मुक्ताला मोठ्या आवाजात सांगतो.
वाचा: अभिनेत्री जुई गडकरी हिला जेलमध्ये टाकण्याची धमकी, काय आहे नेमकी भानगड? जाणून घ्या

सावनी करणार आदित्यचा वापर

दुसरीकडे सावनी आदित्यचा वापर कोळी कुटुंबीयांविरोधात करताना दिसते. ती आदित्यला भूक लागलेली असताना पोळी-भाजी देते. पण ही पोळी-भाजी तिने बनवलेली नसून एका पोळीभाजी केंद्रातून घेतलेली आहे. मीच तुझी किती चांगली काळजी घेऊ शकते हे सावनी आदित्यला पटवून देते. ती आदित्यला आपल्या बाजूने करुन घेते. दुसरीकडे ती स्वातीचे कान भरण्याचा प्रयत्न करते.
वाचा: 'आई-वडील वेगळे झाले तेव्हा मला आनंद झाला', क्षिती जोग पहिल्यांदाच पालकांच्या घटस्फोटावर बोलली

वकीलांनी केले घटस्फोटाचे कागदपत्रे

सागरने स्वाती आणि कार्तिकच्या घटस्फोटाचे कागदपत्र तयार केले आहेत. वकील घरी येताना ते घेऊन येतात. मुक्ता पुन्हा सागरला विचार कर असे म्हणते. तरी सागर त्याच्या मतावर ठाम असल्याचे पाहायला मिळते. मुक्ता वकिलांना विचारते हे कागदपत्र रद्द करता येतात ना. ती वकिलांशी बोलत असताना स्वाती ते पाहाते आणि इंद्राला सांगते की बघ सागरचे कसे कान भरते. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार हे जाणून घ्या..
वाचा: अभिनेते महेश मांजरेकर यांच्या 'जुनं फर्निचर'ची कमाल, तीन दिवसात कमावले कोट्यवधी रुपये

IPL_Entry_Point