'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ता आणि सागर दोघेही स्वातीचे चांगले व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत. पण कार्तिकच्या प्रेमात असलेल्या स्वातीला तिचा नवरा जे काही करतोय ते योग्य आहे असेच वाटत आहे. तो काहीच चुकीचे करु शकत नाही असा स्वातीचा समज आहे. त्यामुळे ती मुक्ताचा बदला घेण्याचा निर्णय घेते. आता यासाठी स्वातीने नवा डाव आखला आहे. पण तिचा हा डाव मुक्ताला कळतो. त्यामुळे पुढे काय होणार हे मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे.
सतत होणार्या भांडणामुळे सागर मुक्ता एकमेकांशी बोलत नाही. मुक्ताला देखील सागरच्या बोलण्याचा प्रचंड राग आला आहे. तिला मनवण्यासाठी सागर बाहेरचा प्लान करतो. पण मुक्ता पटकन त्याला होकार देत नाही. शेवटी मुक्ता तयार होते आणि दोघेही फिरायला जायचा प्लान करतात.
वाचा: सरोजने कलासाठी आखला मोठा डाव, अद्वैतला कळताच काय होणार 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत
सावनी आदित्यला सांगते त्याच्या शाळेतून फोन आलेला असतो. त्याला एक नवा प्रोजेक्ट देण्यात आला आहे. या प्रोजेक्टमध्ये एक दिवस पूर्ण त्याच्या वडिलांसोबत घालवायचा आहे आणि त्याची आठवण म्हणून फोटो वहिमध्ये चिटकवायचे आहेत असे खोटे सावनी बोलते. आदित्य सागरला फोन करतो आणि दिवस एकत्र घालवायला सांगतो. सागरला प्रश्न पडतो की मुक्ताला आता नकार कसा देणार. शेवटी मुक्ताच तिचा प्लान बदलते आणि आदित्यला घरी बोलावून त्याच्यासाठी नवा प्लान करते.
वाचा: चित्रपट पाहण्याचा विचार करत आहात? मग हे दोन मराठी सिनेमे चांगला पर्याय ठरु शकतात
स्वाती सकाळी उठून भाजी आणण्यासाठी आणि बाहेर फिरायला जाते. ती बराच वेळ घरात नसल्यामुळे इंद्रा तांडव करते. स्वातीला काही झाले तर या सगळ्याला मुक्ता जबाबदार असणार असे स्पष्ट बोलते. तेवढ्यात स्वाती येते. सगळ्यांना आनंद होतो. स्वाती सर्वांसाठी चहा ठेवते. ती मुक्ताच्या चहामध्ये काही तरी औषध मिसळते. मुक्ताला त्याची त्वचा लाल झाल्यावर काही तरी चुकीचे खाल्लाची जाणीव होते. शेवटी दुसऱ्या दिवशी ती स्वातीला चहामध्ये ते औषध मिसळताना पाहाते. आता मुक्ताचे पुढचे पाऊल काय असणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: 'तिकडे वडिलांना अग्नी देत होते आणि मी हास्यजत्रेच्या खूर्चीत', प्रसाद ओकने सांगितला धक्कादायक अनुभव
संबंधित बातम्या