स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत सागरने कार्तिकला तुरुंगात टाकले आहे. त्याने मुक्ता तसेच आरतीसोबतही गैरव्यवहार केल्यामुळे सागरने कार्तिकला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्याने सगळे पुरावे एकत्र केले आणि सर्वांसमोर सादर केले. शेवटी मुक्ता निर्दोश असल्याचे सिद्ध केले. आता मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
सागरने आरतीला सर्वांसमोर आणून कार्तिक दोषी असल्याचे सिद्ध केले. तसेच मुक्ता आणि तिच्या कुटुंबीयांचा विश्वास त्याने जिंकला आहे. सागर कार्तिकला पोलिसांच्या ताब्यात देतो. तरी देखील स्वाती आणि इंद्राचा विश्वास बसत नाही. त्या दोघीही कार्तिक निर्दोषी असल्याचा जप लावतात. मुक्ता सगळं झाल्यानंतर आई-वडिलांच्या घरी पुन्हा निघून जाते. सागर तिला आणण्यासाठी जातो. पण स्वाती आणि इंद्रामुळे ती नकार देते.
वाचा: सलूनच्या बाहेर स्वत:चा फोटो पाहून संतोष जुवेकरने केली मेजशीर पोस्ट, म्हणाला 'अपून तो हिरो बनगया!'
स्वातीच्या मनात बदल्याची भावना निर्माण होते. त्यामुळे ती कोणाशीही न बोलता खोलीत जाऊन बसते. इंद्रा तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असते. पण ती काही बोलयला तयार नसते. तेवढ्यात तिला कार्तिकचा तुरुंगातून फोन येतो आणि एक प्लान सांगतो. तिला घरातल्या सर्वांशी आनंदाने आणि जे झाले ते चुकीचे झाले असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यास सांगतो. त्यामुळे स्वाती इंद्राला घेऊन गोखले यांच्या घरी जाते आणि मुक्ताची माफी मागते. पण मुक्ताला स्वातीचे वागणे खटकते. तरीही ती इतर सगळ्यांचा विचार करुन पुन्हा कोळी कुटुंबीयांच्या घरी जाते.
वाचा: बायकोचं सामान उचलून कुशल बद्रिके निघाला फिरायला, मजेशीर फोटो शेअर करत म्हणाला...
मुक्ता घरी परत आल्यामुळे सगळ्यांना आनंद होतो. पण स्वातीच्या मनात जे काही सुरु असते ते कोणाला माहिती नसते. मुक्ता घरी आल्यामुळे सर्वजण आनंदात एकत्र जमलेले असतात. ते कपल गेम खेळतात. या खेळादरम्यान मुक्ता सर्वांचे आभार मानते. तसेच मिहीकाच्या मनात ही मिहिरविषयी आदर निर्माण होतो. आता मालिकेच्या आगामी भागात मुक्ता स्वातीच्या जाळ्यात अडकणार हे पाहायला मिळणार आहे. तसेच कार्तिक काय नवा डाव आखणार हे देखील स्पष्ट होणार आहे.
Actor Sahil Khan arrested: महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खान याला अटक
संबंधित बातम्या