Premachi Goshta: इंद्रा शिकवणार सावनीला चांगलाच धडा, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार?-premachi goshta serial 24th august 2024 update ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Premachi Goshta: इंद्रा शिकवणार सावनीला चांगलाच धडा, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार?

Premachi Goshta: इंद्रा शिकवणार सावनीला चांगलाच धडा, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 24, 2024 05:24 PM IST

Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. चला जाणून घेऊया...

Premachi Goshta: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार
Premachi Goshta: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार

छोट्या पडद्यावरील 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहे. या मालिकेतील मुक्ता, सागर, इंद्रा, स्वाती, लकी, माधवी, मिहिका, सावनी, आदित्य, सई प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहेत. या मालिकेतील मुक्ताचा स्वभाव हा प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. तिचा साधेपणा कायम प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे. आता सागरची एक्स वाईफ सावनी पुन्हा त्यांच्या आयुष्यात वादळ आणत आहे. चला जाणून घेऊया आजच्या भागात काय घडणार?

सावनीने उगारला आदित्यवर हात

'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही आदित्यची प्रकृती ठीक नसल्यापासून होते. सागर आदित्यसाठी औषधे घेऊन येतो. ती औषधे तो घेण्यास नकार देतो. त्यानंतर सागर त्याला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करतो. तरीही आदित्य ऐकायला तयार नसतो. शेवटी सावनी आदित्यवर चिडते. ते हात उगारते. तेवढ्यात मुक्ता तेथे येते आणि तिला थांबवते. नंतर मुक्ता चाटण तयार करते. त्यात आदित्यचे औषध टाकते. आदित्य ते आवडीने खातो. त्यानंतर आदित्य सईसोबत खेळायला जातो.
वाचा: मनोज वाजपेयीने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट, कोट्यवधी रुपयांचा व्यवहार

मिहिर जाणार सिंगापूरला

मिहिकाने लग्न केल्याचे कळताच मिहिरला धक्का बसतो. तो स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करतो. सागर आणि मुक्ता त्याला मदत करत असतात. सतत मिहिरच्या डोक्यात तेच तेच विचार येत असतात. त्यामुळे तो सागर त्याला बाहेर पाठवण्याचा निर्णय घेतो. कामानिमित्त मिहिरला सिंगापूरला का पाठवत आहात असा विचार मुक्ता करते. त्याला सध्या कुटुंबीयांची गरज आहे असे ती म्हणते. तेवढ्यात सावनी तेथे येते. ती मुक्ताला चांगलेच सुनावते. तसेच मिहिरला कामावर लक्ष केंद्रीत करायला सांगते.

इंद्राने सावनीला शिकवला धडा

कोळींच्या घरी काम करणारी बाई येत नाही. त्यामुळे सगळे काम तसेच पडलेले असते. मुक्ता रात्रीची भांडी घासायला घेते. तेवढ्यात तेथे स्वाती आणि इंद्रा येतात. त्या दोघीला मुक्ताला बरे नाही म्हणून खोलीत पाठवतात. तेवढ्यात इंद्राला सावनीची आठवण येते. ती सावनीला बोलावून आणते आणि भांडी घासायला तयार होते. ऐकेल ती सावनी कसली. शेवटी इंद्रा धावनीला आदित्यची धमकी देते आणि ते पाहून सावनी तयार होते. सागर तेथे येतो आणि ते पाहून हसू लागतो. तो मुद्दाम सावनीसमोर मुक्ताला बरे नाही म्हणून दूध देत असल्याचे सांगतो. तसेच त्या दूधात हळद घालतो.