'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील सावनी शांत बसायचे नाव घेत नाही. स्वत: कडे पैस नाहीत, राहायला घर नाही तरी ही तिचा माज कमी व्हायचे नाव घेत नाही. ती सतत मुक्ता आणि सागरला टोमणे मारताना दिसते. इतकच काय तर ती मुक्ताची जागा घेण्याचा देखील प्रयत्न करत आहे. आता मुक्ता सावनीवर प्रचंड चिडली आहे. तिने थेट तिला धमकी दिली आहे. आजच्या भागात 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नेमकं काय होणार चला जाणून घेऊया...
'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आजच्या भागात रक्षाबंधन हा सण साजरा केला जात आहे. मुक्ताने सगळ्यांसाठी काहीना काही गिफ्ट आणले आहेत. तिने सर्वांना ते दिले आहेत. मिहिर नेहमी मुक्ताकडून राखी बांधून घेतो. त्यामुळे तो यंदाही कोळी कुटुंबीयांच्या घरी आला आहे. यावेळी सावनी तेथे असल्यामुळे त्याला राखी बांधते. गेली कित्येक वर्षे सावनी मिहिरला राखी बांधत नव्हती. मुक्तानेच मिहिरला लहान भावासारखे सांभाळले आहेत. आता सावनी मिहिरला राखी बांधायला जाते. तेवढ्यात मिहिर तिला थांबवते. तो मुक्ताला बोलावतो. पहिली राखी मुक्ताकडून बांधून घेतो. ते पाहून सावनीचा जळफळाट होतो.
सर्वजण आनंदाने समुद्रावर जायला निघतात. मुक्ता देखील त्यांच्यामध्ये सहभागी होते. सागर, लकी आणि आदित्य हे पारंपरिक लूक करुन ढोल ताशाच्या गजरात समुद्रावर जायला निघतात. स्वाती, सई, इंद्रा सर्वजण आनंदाने नाचत असतात. आदित्यची देखील नाचायची इच्छा होते. पण सावनी तिला अडवते. त्याचा हात पकडून बसते. त्यानंतर तिचा पाय चिखलात अडकतो. पाय धुण्यासाठी ती घरी येते.
वाचा: 'पब्लिसिटी स्टंट', अरशद वारसीने प्रभासला जोकर म्हटल्याने दाक्षिणात्य कलाकार संतापले
सावनी घरी येते आणि पाय धुते. तेवढ्यात माधवी गोखले सागरचे घर उघडे असल्याचे पाहते. ती आवज देते पण घरात कुणी नसते. त्यामुळे माधवी घराला बाहेरुन कडी लावते. तेवढ्यात सावनी पाय स्वच्छ धुवून बाहेर येते. ती दार उघडण्याचा प्रयत्न करते. पण तिला घराचे दार उघडत नाही. हे कोणी तरी मुद्दाम केले असल्याचे सावनी बोलते. कोळी कुटुंबीय समुद्रावर जाऊन येतात तेव्हा दाराची कडी उघडतात. आत सावनीला पाहून त्यांना धक्का बसतो. माधवीने हे मुद्दाम केल्याचे सावनी आरोप करते. तेवढ्यात मुक्ता समोर येते आणि बास झालं आता. इथून पुढे माझ्या आईविषयी एक अक्षर जरी बोलली तर सोडणार नाही तुला मी असे बोसते. ते पाहून सर्वांनाच धक्का बसतो. आता मालिकेत पुढे काय होणार? हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.