'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या मुक्ताची परिक्षा सुरु आहे. कार्तिकने तिच्यावर अतिप्रसंग केल्यानंतर मुक्ता पोलिसात धाव घेते. पण त्याआधीच कार्तिक मुक्ताचा क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या आरतीला पोलीस ठाण्यात पाठवतो. तो तिला मुक्ताविरोधात तक्रार करण्यास सांगतो. पोलिस ठाण्यात मुक्ताविरोधातच गुन्हा दाखल होतो. मुक्ता इतक्या उशिरा घरी आलेली नाही म्हणून सागर तिला शोधायला जातो आणि तिला अटक झाल्याचे त्याला कळते. आता पुढे मालिकेत काय होणार?
मुक्ताला सागर घरी घेऊन येतो आणि घडलेला प्रकार सांगतो. त्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. मुक्ता कार्तिकने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा सांगते. तसेच यापूर्वी देखील कार्तिकने काय केले होते हे मुक्ता सर्वांसमोर सांगते. पण तिच्याकडे कोणताही पुरावा नसल्यामुळे तिच्यासोबत कोणीही उभे राहात नाही. शेवटी मुक्ताला इंद्रा बाहेर काढते. तेवढ्यात मुक्ताची आई माधवी आणि वडील पुरुषोत्तम तेथे येतात. ते दोघे मुक्ताला घेऊन घरी जातात. इतकं झाल्यानंतरही मुक्ताला सईची काळजी सतावात असते. हे सगळं सुरु असताना सागर मनात एक निश्चय करतो की मी मुक्ताला या घरात मानाने पुन्हा घेऊन येईन.
वाचा: 'तारक मेहता' मालिकेतील अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, बहिणीच्या निधनाने बसला धक्का
मुक्ताला पुरु आणि माधवी घरी घेऊन गेल्यावर सागर कोळी व त्यांच्या कुटुंबीयांना विरसण्याचा सल्ला देतात. ती सतत तिला या सगळ्यातून बाहेर पडण्यास सांगतात. तेवढ्यात मुक्ताला एक फोन येतो आणि दिल्लीला एक सेमिनार असल्याचे सांगण्यात येते. या सेमिनारमध्ये नव्या टेक्नॉलॉजी आणि मोठ्या डॉक्टरांना भेटण्याची संधी मिळणार असते. त्यामुळे पुरु तिला या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी ही चांगली संधी आहे असे सांगत असतो. पण मुक्ता मात्र तिच्या निर्णयावर ठाम आहे. ती सई माझी पहिली जबाबदारी आहे असे सांगते.
वाचा: ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील अभिनेता अडकला लग्नबंधनात, कलाकारांच्या हजेरीचा व्हिडीओ व्हायरल
सई सकाळी उठल्यावर पहिले मुक्ताला शोधते. इंद्रा तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते. पण ती काही ऐकत नाही. तेवढ्यात सागर तेथे येतो आणि तिला मुक्ताच्या घरी घेऊन जातो. तेवढ्यात मुक्ता आणि पुरु दिल्लीला जाण्याविषयी बोलत असतात. तेवढ्यात सागर तिला तू सईला घेऊन जाऊ शकते असे बोलतो. पण त्यावर देखील मुक्ता प्रश्नचिन्ह उपस्थित करते. त्यावर उपाय म्हणून सागर एक करार करतो आणि त्यावर सईवर केवळ मुक्ताचा अधिकार असल्याचे लिहितो. आता मुक्ता खरच दिल्लीला जाणार का?हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.
वाचा: 'या' कारणामुळे अर्शद वारसी याने अमिताभ बच्चन यांना 'गॉडफादर' म्हणण्यास दिला होता नकार
सागर आणि मुक्ता हे एकत्र राहात नसल्याचे कळताच सावनी मुक्ताच्या जखमेवर मिठ चोळायला येते. तसेच तिला तू केवळ सईची आई आहेस. सागरने तुला अजून बायकोचा दर्जा दिलेला नाही असे सांगते. मुक्ताला वाईट वाटते पण ती सावनीला चांगलेच उत्तर देते. त्यानंतर सावनी न्यायाधिशांना घेऊन घरी येते आणि सांगते मुक्ता-सागर एकत्र राहात नाहीत. त्यामुळे सईची कस्टडी मला हवी. तेवढ्यात मुक्ता तेथे येते आणि सगळं सुरळीत असल्याचे दाखवते. सावनीचा हा डाव देखील अयशस्वी ठरतो.