'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ता ही संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. तिचा स्वभाव, तिचे वागणे प्रेक्षकांची मने जिंकत आहे. मालिकेत मुक्ता ही भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधानने साकारली आहे. मुक्ता एक डेंटिस्ट आहे. तिने सईसाठी सागर कोळीशी लग्न केले आहे. पण तिचा चांगूलपणा सर्वांना खटकत आहे. नुकताच मुक्ताने सावनीसाठी नवी साडी खरेदी केली आहे. ते पाहून नेटकऱ्यांना देखील धक्का बसला आहे. चला जाणून घेऊया आजच्या भागात नेमकं काय होणार?
'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही मुक्ता पाय घसरुन पडल्यापासून होते. तेवढ्यात आदित्य तेथे येतो आणि मुक्ता त्याच्याकडे मदतीचा हात मागते. आदित्य देखील मदतीचा हात पुढे करतो. त्यानंतर मुक्ता सई आणि आदित्यला घेऊन नारळीपौर्णिमेनिमित्त रांगोळी काढण्यास सांगते. मुक्ता, सागर, आदित्य आणि सई चौघे मिळून रांगोळी काढतात. सणाची तयारी करतात. ते पाहून सावनीचा जळफळाट होतो.
नारळी पौर्णिमा असल्यामुळे मुक्ता सागरसाठी पारंपारिक कपडे खरेदी करते. ती आदित्यसाठी देखील तसेच सारखे कपडे खरेदी करते. ती घरातील सर्वांसाठी नवे कपडे खरेदी करते. त्यामुळे मुक्ता सावनीसाठ देखील नवी साडी खरेदी करते. सागर ती नवी साडी सावनीला नेऊन देतो. पण सावनी ती फेकून देते. तिला मुक्ताचा प्रचंड राग येतो. ती आदित्यला देखील भडकवण्याचा प्रयत्न करते. पण आदित्य आता पुढे काय करणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा : सैफ अली खानवर दिल्लीतील नाइट क्लबमध्ये झाला होता हल्ला, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
आज 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत रक्षाबंधन हा सण साजरा होणार आहे. सर्वजण तयारी करुन रक्षाबंधन साजरा करण्यासाठी बसलेले असतात. सागरने स्वातीला घर गिफ्ट केले आहे. हे मुक्ताने केले असल्याचे सागर सर्वांना सांगतो. त्यानंतर मिहिर देखील सागरच्या घरी येतो. मिहिर पाटावर बसतो. सावनी त्याला ओवाळण्यासाठी येते. तेवढ्यात मिहिर तिला थांबवतो. सर्वात पाहिले मला माझी मोठी बहिण राखी बांधेल. मिहिर मुक्ताला बोलावतो त्यामुळे सावनीचा जळफळाट होतो. सावनीच्या डोक्यात आणखी राग येतो. आता सावनी पुढे काय करणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.