'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनी कोळी कुटुंबीयांच्या घरी राहायल्या आल्यापासून रोज काही तरी नवा ड्रामा सुरु असतो. सावनी सागरची पहिली बायको असली तरी देखील मुक्ता मोठ्या मनाने तिला घरात राहू दिले आहे. मुक्ता केवळ आदित्यसाठी सावनीची सगळी नाटकं सहन करत असते. रक्षाबंधन हा सण मालिकेत साजरा केला जाणार आहे. सावनी मिहिरला राखी बांधायला जाते तो तिला थांबवतो आणि मुक्ताला राखी बांधायला सांगतो. आता यावर सावनीची काय प्रतिक्रिया असणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
आदित्यच्या शाळेत मुक्ताला बोलावण्यात येते. तो नापास होत असल्याचे सांगितले जाते. तेवढ्यात त्याला चक्कर येते. मुक्ता त्याला घेऊन घरी येते. तसेच त्याला सायकॅक्ट्रीसची ट्रीटमेंट देते. सावनी याला विरोध करते पण नंतर तयार होते. डॉक्टरी सागरला सांगतात की आदित्यला त्याचे आई-बाबा हवेत. त्यामुळे सागर आदित्यला फिरायला घेऊन जायचे ठरवतो. त्यावर सावनीच्या डोक्यात नवा प्लान येतो. ती सागरशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करते. ते पाहून मुक्ताच्या डोळ्यात पाणी येते.
मुक्ता आदित्यसाठी जे काही करत आहे ते पाहून इंद्राला अभिमान वाटते. ती मुक्ताला जवळ घेते आणि सांगते 'तू जे करत आहेस ते करायला मोठं मन लागतं. इथे कोणाला तुझा अभिमान वाटत नसला तरी मला आहे.' त्यानंतर मुक्ता भावूक होते. ती इंद्राला घट्ट मिठी मारते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुक्ता सर्वांसाठी नाश्ता वैगरे बनवत असते. तेवढ्यात मुक्ताचा पाय घसरतो. आदित्य समोर येतो. मुक्ता आदित्यला हात द्यायला सांगते. आता आदित्य हात देणार का हे उद्याचा भागात कळेल.
वाचा : पुढच्या वर्षी अभिनेत्री सायली संजीव करणार लग्न? रक्षाबंधनानिमित्त शेअर केलेल्या व्हिडीओची चर्चा
आज 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत रक्षाबंधन हा सण साजरा होणार आहे. सर्वजण तयारी करुन रक्षाबंधन साजरा करण्यासाठी बसलेले असता. मिहिर देखील सागरच्या घरी येतो. मिहिर पाटावर बसतो. सावनी त्याला ओवाळण्यासाठी येते. तेवढ्यात मिहिर तिला थांबवतो. सर्वात पाहिले मला माझी मोठी बहिण राखी बांधेल. मिहिर मुक्ताला बोलावतो त्यामुळे सावनीचा जळफळाट होतो. सावनीच्या डोक्यात आणखी राग येतो. आता सावनी पुढे काय करणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.