'प्रेमाची गोष्ट' मालिकेत कार्तिकने मुक्तावर अतिप्रसंग केल्यामुळे सागरने त्याला चांगलाच धडा शिकवला आहे. थेट त्याला तुरुंगात टाकले आहे. त्यानंतर तो त्याला कठोर शिक्षा देण्याचा निर्णय घेतो. दुसरीकडे मुक्ता आणि सागरमध्ये जवळीक निर्माण होत आहे. पण स्वातीचा जेव्हा विषय येतो तेव्हा तो मुक्ताशीही भांडण करताना दिसतो. स्वातीवरुन मुक्ता आणि सागरमध्येही वाद होतात. पण दोघांचा हेतू मात्र, सारखा असतो. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
सागर वकिलांना बोलावून घेतो. त्यांना स्वाती आणि कार्तिकच्या घटस्फोटाचे पेपर तयार करायला सांगतो. तो स्वातीवर तिच्या सह्या देखील घेतो. स्वाती पेपरवर सही करण्यास नकार देत. पण सागर तिला बोलून पेपरवर सही करुन घेतो. मुक्ताचा याला विरोध असतो. पण सागर मुक्ताला याविषयी काही बोलू देत नाही. स्वाती घटस्फोटाच्या पेपरवर सही करते आणि पळत खोलीत निघून जाते.
वाचा: घरच्यांना सांग सुखरुप निघालो; संकर्षण कऱ्हाडे याने सांगितला राज ठाकरेंच्या भेटीचा किस्सा
इंद्रा आणि स्वाती या दोघीही बाहेर गेलेल्या असतात. त्या दोघी घरी येत असताना सावनी मागून आवज देतो. दोघीही तिच्याकडे दुर्लक्ष करतात. पण सावनी जबरदस्ती त्यांच्याशी बोलायला येते आणि स्वत:चे मत त्यांच्यावर लादते. सागरचे कान कोणी तरी भरत आहे आणि तुमच्याविरोधात त्याला उभे करत आहेत. मुक्ताच हे काम करत आहे असे ती म्हणते. त्यावर इंद्रा लगेच तिला तू आमच्या घरच्या भांडणात पडू नकोस असे बजावते. नंतर ती स्वातीला देखील सल्ला देते की हिच्याकडे फार लक्ष देऊ नकोस. आता स्वाती काय करणार हे आमागी भागात कळणार आहे.
वाचा: 'लोकांना लाज का वाटत नाही', इंटीमेट सीनवरुन ट्रोल करणाऱ्यांना श्वेता तिवारीने सुनावले
सागर घटस्फोटाचे पेपर घेऊन तुरुंगात जातो. कार्तिकला त्यावर सही करण्यास सांगतो. पण कार्तिक मात्र तयार होत नाही. तो मी या पेपरवर सही करणार नाही असे स्पष्ट सांगतो. त्यानंतर तो सावनीला फोन करुन तिच्याकडे मदत मागतो. सावनी त्याला मदत करण्याचा निर्णय घेते. आता कार्तिक जेलमधून कधी बाहेर येणार? बाहेर आल्यावर त्याचा काय डाव असणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, खरेदी केले नवे घर
संबंधित बातम्या