'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ता ही संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. तिचा स्वभाव, तिचे वागणे प्रेक्षकांची मने जिंकत आहे. मालिकेत मुक्ता ही भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधानने साकारली आहे. मुक्ता एक डेंटिस्ट आहे. तिने सईसाठी सागर कोळीशी लग्न केले आहे. पण आता सागर आणि मुक्तामध्ये जवळीक निर्माण झाली आहे. पण सागरची पूर्वपत्नी सावनी ही सतत त्यांच्या संसारात डोके घालत असते. आदित्यमुळे मुक्ता सागरला सोडून जाणार असल्याचे बोलले जात आहे.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजाच्या भागाची सुरुवात ही मुक्ता आणि सागर फिरायला जाणार असल्यामुळे इंद्रा चकली, लाडू, वेफर्स बनवताना दिसते. लकी ते खाण्याचा प्रयत्न करतो. पण इंद्रा त्याला खाऊ देत नाही. उलट ती सागरला आवज देते घरात चोर आलाय बघ. सागर इंद्राला हे सगळे नको करु असे सांगत असतो. एकंदरीत सगळे मजामस्ती करताना दिसतात. मुक्ता देखील या सगळ्याचा आनंद घेत असते.
महिला सुरक्षण विभागाच्या काही महिलांना मिहिका घरी बोलावते. त्यांच्यासोबत गप्पा मराते. तेथेच समोर हर्षवर्धन देखील बसलेला असतो. ती त्या महिलांशी बोलत असते तुम्ही एखादा जर महिलेवर जबरदस्ती करत असेल, तिला त्रास देत असेल तर काय करता? त्यावर ती महिला अध्यक्ष म्हणते की आम्ही त्याच्या तोंडाला काळे फासतो, त्याची गाढवावर बसून धिंड काढतो. तसेच मीडियासमोर त्याला त्या महिलेची जाहीर माफी मागण्यास सांगतो. त्यावर मिहिका मलाही या सगळ्या कामात तुम्हाला मदत करायला आवडेल असे बोलून हर्षवर्धन कडून १० लाख रुपयांचा चेक घेऊन त्यांना देते.
वाचा: सौभाग्य आणि सूडाच्या संघर्षाची कहाणी, 'दुर्गा' ही नवी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
आदित्यच्या शाळेत मुक्ताला बोलावण्यात येते. तो नापास होत असल्याचे सांगितले जाते. तेवढ्यात त्याला चक्कर येते. मुक्ता त्याला घेऊन घरी येते. तसेच त्याला सायकॅक्ट्रीसची ट्रीटमेंट देते. सावनी याला विरोध करते पण नंतर तयार होते. डॉक्टरी सागरला सांगतात की आदित्यला त्याचे आई-बाबा हवेत. त्यामुळे सागर आदित्यला फिरायला घेऊन जायचे ठरवतो. पण या सगळ्यात सावनी त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते. आता मुक्ता आदित्यसाठी सागरला सोडून जाणार का? हे मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.