'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काही दिवसांपूर्वी सावनी आणि हर्षवर्धनचे लग्न मोडले. असे ही हर्षवर्धनला सावनीशी लग्न करण्याची जराही इच्छा नव्हती. त्यामुळे तो फक्त निमित्त शोधत होता. हर्षवर्धनने मिहिकाला मोहरा बनवून लग्न मोडले. आता सावनी आदित्यला घेऊन सागरच्या घरी राहात आहेत. पण ती सतत कोळी कुटुंबीयांना त्रास देत आहे. आता तर सावनीने हद्दच पार केली आहे. मुक्ता आणि सागर लग्नानंतर कुठेही हनीमूनला गेले नसतात. ते फिरायला जाण्याचा निर्णय घेतात हे सावनीला कळताच ती नवा डाव आखते. आज मालिकेत काय होणार वाचा...
प्रेमाची गोष्ट मालिकेत आजच्या भागाची सुरुवात ही सागर आणि मुक्ता बिल्डींग खाली बसलेले असतात. सागर मुक्ताला घरी कधी येणार हे विचारत असतो. मुक्ता आईने केलेला हट्ट सांगते. त्यामुळे दोघांचाही मूड खराब होतो. दोघे मध्यरात्रीपर्यंत गप्पा मारत असतात. त्यानंतर माधवी त्यांना पाहते आणि चिडते.
स्वाती मुक्ताचे कपाट उघडते आणि कपडे शोधत असते. त्यावेळी तिला मुक्ताचा कपाटात फ्लाईटचे तिकिट सापडते. हे तिकिट सागर आणि मुक्ताच्या नावावर असते. स्वाती पळत इंद्राकडे जाते आणि तिकिटांविषयी सांगते. इंद्रा ती तिकिटे घेऊन मुक्ताकडे जाते. तेवढ्यात माधवी, मुक्ता आणि सागर यांचा संवाद सुरु असतो. इंद्रा मुक्ताला विचारते हे काय आहे. तेव्हा मुक्ता सांगते की आम्ही फिरायला जायचे म्हणून तिकिट काढून ठेवले होते. पण परिस्थितीमुळे जाणे रद्द केले. यावर इंद्रा आणि माधवी मुक्ताला जबरदस्ती पाठवण्याचा निर्णय घेतात.
वाचा : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकारांना बक्षिस म्हणून किती रक्कम मिळते माहिती आहे का?
सावनीला मुक्ता आणि सागर फिरायला जाणार असल्याचे कळते. तेव्हाच ती ठरवते की मुक्ताला फिरायला जाऊ देणार नाही. त्यासाठी ती आदित्यला मोहरा बनवते. ती आदित्यला सांगते जर मुक्ता आणि सागर फिरायले गेले तर आल्यावर ते दोघे आपल्याला बाहेर काढतील. त्यावर आता आदित्य काही तरी करावे लागेल असे म्हणतो. सागर आणि मुक्ता फिरायला जाणार असतात तेव्हा आदित्यला ताप येतो. आता ते पाहून सागर आणि मुक्ताल त्यांचा फिरायला जायला प्लान रद्द करणार का? हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.