Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या अतिशय वेगळे वळण आले आहे. मालिकेत सावनीचा डाव यशस्वी होताना दिसत आहे. सावनी सागर आणि मुक्ताच्या आयुष्यात फूट पाडताना दिसत आहे. तिचा डाव यशस्वी देखील होत आहे. या सागर सतत दाखवत असलेल्या अविश्वासाला कंटाळून मुक्ता घर सोडून निघून गेली आहे. आता मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सागरला सतत मुक्ता आणि आशयमध्ये काही तरी सुरु असल्याचे वाटत आहे. त्यात सावनी आणखी आग लावत असते. सावनी सतत सागरला दाखवत असते ती मुक्ताच्या आयुष्यात आशय खूप महत्त्वाचा आहे. सागरची चिडचिड पाहून मुक्ताला ताय करावे आणि काय करु नये असा प्रश्न पडतो. ती सागरशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. पण सागर मुक्ताचे काही ऐकायला तयार नव्हतो.
मुक्ता सागरला पुन्हा एकदा समजावण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये जाते. तेथे जाऊन ती त्याला समजावत असते. पण सागर तेव्हा ही काही ऐकायच्या मनस्थितीमध्ये नसतो. त्यामुळे तो मुक्ताला तेथून निघून जायला सांगतो. मुक्ता कोणतेही स्पष्टीकरण न देता तेथून निघून जाते. त्यामुळे सागरच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात.
सागर मुक्ताशी घरात नीट वागत नसल्याचे सावनी आशयला सांगते. त्यानंतर आशय चिडतो आणि सागरच्या ऑफिसमध्ये जातो. आशय सागरला चांगलेच सुनावतो. त्यानंतर सागर रागात घरी निघून जातो. त्याच्या मनात सतत आशय जे काही बोलला ते सुरु असते. शेवटी घरी आल्यावर सागर त्याचा राग इतरांवर काढायला सुरुवात करतो. मुक्ता सईला जेवण भरवत असते. तिच्या हातातून सागर ताट खेचून घेतो. नंतर तो सईला हाताने खा, उद्या मुक्ता आई नसली तर काय करशील असा प्रश्न विचारतो.
वाचा: अतुल परचुरेंबद्दल बोलताना निवेदिता सराफांना कोसळले रडू, शब्दही फुटत नव्हते
सागर मुक्ताला सर्वांच्या आयुष्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या मनात मुक्ताविषयी विष निर्माण होते. तो मुक्ताच्या कपाटातील सगळे कपडे फेकून देतो. मुक्ता ते पाहून घाबरते. शेवटी मुक्ता घर सोडून निघून जाते. ती सोबत सईला घेऊन जाते. आता मुक्ताची आई मुक्ताला समजावणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
संबंधित बातम्या