Premachi Goshta: मुक्ताची जागा घेण्याचा सावनीचा प्रयत्न, प्रेमाची गोष्ट मालिकेत आज काय घडणार-premachi goshta serial 16th august 2024 update ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Premachi Goshta: मुक्ताची जागा घेण्याचा सावनीचा प्रयत्न, प्रेमाची गोष्ट मालिकेत आज काय घडणार

Premachi Goshta: मुक्ताची जागा घेण्याचा सावनीचा प्रयत्न, प्रेमाची गोष्ट मालिकेत आज काय घडणार

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 16, 2024 04:33 PM IST

Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. सावनी जेव्हा पासून सागरच्या घरी राहायला आली आहे तेव्हा पासून सतत काही ना काही होताना दिसते. चला जाणून घेऊया आजच्या भागात काय होणार?

premachi goshta
premachi goshta

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत हर्षवर्धनने सावनीला घरातून काढून टाकल्यावर ती आदित्यला घेऊन सागरच्या घरी राहात आहेत. सावनी घरी आल्यापासून कोळी कुटुंबात एक वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. सावनीने सागरच्या घरी राहणे मुक्ताची आई माधवीला पटत नाही. तिला घरातून बाहेर कढा अशी मागणी माधवी करते. आता आजच्या भागात काय होणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहे.

इंद्राने आखला नवा प्लान

'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागात इंद्रा आणि माधवी सावनीला बाहेर काढण्याचा प्लान करतात. त्या दोघीही घराचे पेंटिंग काढतात. सावनीला पेंटिंगचा वास सहन होत नाही. त्यामुळे ती चिडते. इंद्राने हे मुद्दाम केल्यामुळे सावनी चिडते. ती आदित्यला घेऊन जाण्याची धमकी देते. तिच्या या धमकीने सर्वजण घाबरतात.

माधवी मुक्ताला घेऊन गेली घरी

सावनीचे वागणेपाहून मुक्ताची आई माधवी चिडते. त्या थेट एकतर कोळी कुटुंबात सावनी राहिल नाही तर मुक्ता असे स्पष्ट बोलते. तसेच सावनी असे पर्यंत मी मुक्ताला पाठवणार नाही असे देखील म्हणते. त्यानंतर इंद्रा सावनीला ऐकवते. पण हा प्लान इंद्रा आणि माधवीचा असतो हे कुणाला कळत नाही. हे सगळं सुरु असताना सावनीला आनंद होतो. मुक्ता स्वत:हून घराबाहेर गेल्यामुळे सावनीला प्रचंड आनंद होतो आणि इथून पुढे कोळी कुटुंबात मुक्ताची जी जागा आहे ती घेण्याचा प्रयत्न करते.

माधवीने मुक्ताला दिली धमकी

मुक्तावाचून सर्वांचे अडले आहे. घरात कुणाला काही सापडत नाही. त्यामुळे सतत सर्वजण गोखलेंच्या घराची बेल वाजवत असतात. ते पाहून माधवीची आणखी चिडचिड होते. ती मुक्ताला थेट सांगते जर तू तिकडे गेली तर परत या घरात पाऊल ठेवायचे नाही. ते ऐकून मुक्ताला देखील भीती वाटते. ती माधवी बोलेले ते तसे ऐकायचे ठरवते. तेवढ्यात सई येते आणि आयस्क्रीमचा हट्ट करते. त्यावर मुक्ता चिडते आणि आई जे सांगेल ते ऐकायचं असतं असे बोलते. ते ऐकून माधवीला खोकला येतो.
वाचा: हॉरर आणि कॉमेडीचा डबल डोस! तिकिट बूक करण्यापूर्वी वाचा 'स्त्री २'चा रिव्ह्यू

सावनीने बनवलेली ब्राऊनी सगळ्यांनी खाण्यास दिला नकार

मुक्ता माहेरी गेल्यामुळे सावनी तिची जागा घेण्याचा प्रयत्न करते. सावनीने सासूबाई, स्वाती आणि लकीसाठी ब्राऊने बनवते. तिघेही ती खाण्यास नकार देतात. त्यानंतर सई आणि आदित्य घरी येतात. त्यांच्या हातात आयस्क्रीम असते. त्यामुळे ते दोघेही सावनीने बनवलेली ब्राऊनी खाण्यास नकार देतात.