छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक असलेली 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका सध्या टीआरपी यादीमधून घसरली आहे. मालिका सुरुवातीपासून दुसऱ्या क्रमांकावर होती. आता तिच्या क्रमांकामध्ये घसरण झाली आहे. कदाचित प्रेक्षकांना मालिकेचे कथानक हे कंटाळवाणे वाटत आहे किंवा मालिकेचा ट्रॅक हवा तसा रंजक वाटत नसावा. पण आता मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. मालिकेच कार्तिकचे सत्य समोर येणार आहे.
प्रेमाची गोष्ट मालिकेत गेल्या काही दिवसांपासून मुक्ता ही सागरवर नाराज आहे. सागरचे आपल्यावर प्रेम नाही आणि तो केवळ प्रेमाचे नाटक करत असल्याचे कळाल्यावर मुक्ताला राग आला आहे. तिने सागरशी बोलणे देखील टाळले. त्यानंतर सागरने पत्र लिहून मुक्ताची माफी मागितली आहे. आता मुक्ता बुचकळ्यात पडली आहे नक्की सागरने मनापासून हे केले आहे की तो पुन्हा खोटे बोलत आहे. तेवढ्यात मुक्ता आई-वडिलांकडे जाते. मुक्ताच्या मनाची परिस्थिती पाहात पुरु तिची समजूत काढतो. 'सागर हा वाईट असता तर मी तुझे लग्न त्याच्यासोबत का करून दिले असते' असे पुरु मुक्ताला सांगतो.
वाचा: सायली नेमकी कोणती? ओळखा पाहू व्हायरल झालेल्या फोटोमधील अभिनेत्री जुई गडकरी नेमकी कोणती?
ऑफिसच्या कामासाठी सागर आणि सावनी गोवा टूरवर असतात. या दरम्यान, सावनी सागरचे कान भरण्याचा प्रयत्न केला आहे. मुक्ताने तुला माझ्यासोबत, एक्स-वाईफसोबत बाहेर कसे पाठवले असा प्रश्न ती विचारते. त्यावर सागर तुला देखील होणाऱ्या नवऱ्याने माझ्यासोबत पाठवले ना? असा उलट प्रश्न विचारतो. त्यावर सावनी सागरचे कान भरते. मुक्ताचा तुझ्यावर विश्वास आणि प्रेम दोन्ही नाही असे म्हणते. सावनीच्या बोलण्यामुळे सागर विचारात पडतो की खरच असे काही नसेल ना...
वाचा: घरावर गोळीबार झाला तेव्हा अभिनेता सलमान खान नेमका कुठे होता? मोठी अपडेट आली समोर
स्वाती आणि इंद्रा या दोघी शॉपिंगसाठी गेलेल्या असतात. त्यामुळे घरात मुक्ता एकटीच असते. कार्तिक या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करतो. तो अचानक मुक्ताचा खोलीमध्ये जातो. तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. मुक्ता त्याला दूर करते. तेवढ्यात इंद्रा आणि स्वाती येतात. मुक्ता देवाचे आभार मानून मदतीसाठी कुणाला तरी पाठवले असे बोलते. मुक्ता घडलेला प्रकार सांगते. पण इंद्राचा मुक्तावर जराही विश्वास नसतो. ती मुक्ताच्या कानशिलात लगावते आणि पुन्हा माझ्या जावयाविषयी काही बोललीस तर जिभ कापून हातात देईन असे म्हणते. मुक्ताला हे ऐकून धक्काच बसतो. मुक्ता हतबल होऊन खोलीमध्ये निधून जाते.