मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मुक्ताच्या आईचा अपघात करणाऱ्याचे नाव आले समोर, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काय असेल सागरचे पुढचे पाऊल?

मुक्ताच्या आईचा अपघात करणाऱ्याचे नाव आले समोर, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काय असेल सागरचे पुढचे पाऊल?

Aarti Vilas Borade HT Marathi
May 11, 2024 09:52 AM IST

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आता एकदम वेगळे वळण आले आहे. मुक्ताच्या आईचा अपघात झाला आहे. तसेच हा अपघात कोणी केला हे देखील सागरला कळाले आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार जाणून घेऊया..

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार
'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ताची आई माधवी गोखले यांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये त्यांना चांगलीच दुखापत झाली आहे. आता हा अपघात कोणी केला आहे याचा छडा घेण्यासाठी सागरने एका माणसाला कामाला लावले आहे. त्या माणसाने गाडी चालवणाऱ्या व्यक्तीचा फोटो सागरला पाठवला आहे. त्यामुळे सागरचे पुढचे पाऊल काय असणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

मिहिर घेतोय माधवी मावशीची काळजी

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मिहिर आणि मिहिकाचा साखरपुडा मोडला आहे. कारण मिहिर हा सावनीचा भाऊ आहे हे सत्य सर्वांसमोर आले आहे. आजपर्यंत मिहिरच्या कुटुंबीयांविषयी फारशी कोणालाच माहिती नव्हती. पण माधवीला मिहिर हा सावनीचा भाऊ आहे हे कळाले तेव्हा तिने या लग्नाला नकार दिला आहे. इतकं सगळं झाल्यानंतरही जेव्हा माधवीचा अपघात होतो तेव्हा मिहिर त्यांच्या शेजारी बसून काळजी घेत असतो.
वाचा: बिग बॉस फेम वीणा जगतापचे छोट्या पडद्यावर पुनरागमन, 'या' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार

सागरने मुक्ताला सांगितले अपघात घडवणाऱ्याचे नाव

सागरला पाठवलेल्या फोटोमध्ये माधवीचा अपघात हा कार्तिकने घडवला असल्याचे समोर आले आहे. तसेच अपघात करणारी गाडी ही सावनीच्या नावावर असते. हे जेव्हा सागरला कळते तेव्हा सागर मुक्ताला फोन करुन सांगतो. मुक्ताचा बदला घेण्यासाठी कार्तिक हे सगळं करत असल्याचा समज सर्वांचा होता. पण इंद्रा मात्र मुक्तावरच चिडते. माझा तुझ्यावर जराही विश्वास नाही असे ती मुक्ताला खोचकपणे बोलते. तर दुसरीकडे स्वाती माझ्या आता कोणावरच विश्वास राहिलेला नाही असे बोलताना दिसते.
वाचा: 'तुला पाहाते रे'नंतर सुबोध भावेचे पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन, नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित

आदित्य खरा गुन्हेगार

सावनी आणि कार्तिकने हा अपघात केल्याचे कळताच सागर तिच्या घरी जातो. आता पोलिसात तक्रार करणार असल्याचे देखील सांगतो. सावनी सागरला अडवण्याचा प्रयत्न करत असते पण सागर कोणाचेही ऐकायला तयार नसतो. तेवढ्यात आदित्य तेथे येतो आणि सागरला थांबवण्याचा प्रयत्न करतो. सागर ऐकत नसल्यामुळे तो शेवटी खरे सांगतो. जर कोणी तरुंगात जाणार असेल तर तो मी असेन असे आदित्य म्हणतो. सागरला हे ऐकून धक्का बसतो.
वाचा: ती परत येतेय... ; तब्बल ९ वर्षांनंतर अभिनेत्री शिवानी सुर्वे दिसणार 'या' मालिकेत

IPL_Entry_Point