मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tejashri Pradhan: आईच्या आठवणीत तेजश्री प्रधान झाली भावूक, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

Tejashri Pradhan: आईच्या आठवणीत तेजश्री प्रधान झाली भावूक, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 02, 2024 12:09 PM IST

Premachi Goshta Actress: सरत्या वर्षाला निरोप देताना तेजश्री प्रधान आईच्या आठवणीत भावूक झाली आहे. तिने आईसोबतचा फोटो शेअर केला आहे.

Tejashri Pradhan
Tejashri Pradhan

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान ओळखली जाते. सध्या ती 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. नोव्हेंबर महिन्यात तेजश्रीच्या आईचे निधन झाले. त्यानंतर तेजश्रीला स्वत:ला सांभाळणे फार कठीण झाले होते. आता सरत्या वर्षात तेजश्रीने आईच्या आठवणीत पोस्ट शेअर केली आहे.

१६ नोव्हेंबरला तेजश्रीच्या आयुष्यात दु:खद घटना घडली. तेजश्रीच्या आई सीमा प्रधान यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. आता तेजश्रीने सोशल मीडियावर आई-बाबांसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने “मला माहित आहे की, तू तिथून मला पाहत आहेस. तू कायम माझ्याबरोबर आहेस हे मला ठाऊक आहे आणि याच विश्वासाने मी माझं यापुढचं संपूर्ण आयुष्य जगत राहणार आहे” असे कॅप्शन दिले.
वाचा: रायगडमध्ये जन्म झालेल्या नाना पाटेकरांचे खरे नाव माहिती आहे का?

तेजश्रीच्या या पोस्टवर अनेक कलाकार आणि नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने “तुझ्या आईचे आशीर्वाद कायम तुझ्याबरोबर आहेत” अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका यूजरने “दगडापासून आपली मूर्ती घडवत असते, ती फक्त आणि फक्त आईच असते” अशी कमेंट केली आहे.

तेजश्रीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेतील तिची मुक्ता ही भूमिका विशेष गाजत आहे. तिच्या या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

WhatsApp channel