मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  लकीचे बिंग फुटणार, एमबीएचा रिझल्ट येणार समोर; 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?

लकीचे बिंग फुटणार, एमबीएचा रिझल्ट येणार समोर; 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 08, 2024 01:47 PM IST

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आजच्या भागात रंजक वळण येणार आहे. लकीचे बिंग फुटणार असून त्याचा खरा रिझल्ट समोर येणार आहे. त्याने परिक्षेत पास झाल्याचे खोटे घरी सांगितले आहे.

लकीचे बिंग फुटणार, एमबीएचा रिझल्ट येणार समोर; 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?
लकीचे बिंग फुटणार, एमबीएचा रिझल्ट येणार समोर; 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या काही ना काही घडताना दिसत आहे. एकीकडे मुक्ताला सागरचा राग आला आहे. तिला मनवण्यासाठी सागर आणि सई प्रयत्न करताना दिसत आहे. दुसरीकडे आता लकीचे बिंग फुटणार आहे. त्याच्या एमबीएच्या परिक्षेचा रिझल्ट आला आहे. हा रिझल्ट मुक्ताच्या हाती लागला आहे. आता मुक्ता सगळ्यांसमोर लकीचे बिंग फोडणार की त्याला समजावणार हे मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सागर, मुक्ता, सावनी, आदित्य, लकी या पाचही पात्रांच्या आयुष्यात काही ना काही घडामोडी घडताना दिसत आहेत. मुक्ताची नाराजी दूर करायचा सागरचा प्रयत्न सुरु आहे तर दुसरीकडे सावनीला सागरच्या हाताखाली काम करताना नाके नऊ आले आहेत. तिसरीकडे लकीचे सत्य समोर आले आहे. तर आदित्यला आता मुक्ता आणि सागर हे वाईट नसल्याचे जाणवत आहेत. आता नेमके काय होणार? जाणून घ्या..
वाचा: 'राजकारणात नव्या विचारसरणीची गरज आहे', सई ताम्हणकरच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?

सागर सावनीला शिकवणार धडा

सागर पहाटे ५ वाजता एक मिटिंग ठेवतो. ती मिटिंग अचानक रद्द करुन सकाळी ८ वाजता तिला घरी बोलावतो. पण इंद्रा सावनीला काही घरात घ्यायला तयार नसते. कसेबसे सावनी घरात एण्ट्री मिळवते. पण इंद्रा सावनीकडून घरकाम करुन घेते. तिला फरशी पुसायला लावते. सावनी देखील ते काम करते. सागर हे सगळं पाहून मजा घेत असतो.
वाचा: नियंत्रण सुटल्यामुळे सुपरस्टार अजित कुमार याच्या गाडीचा भीषण अपघात, व्हिडीओ आला समोर

आदित्यच्या मनात सागरविषची प्रेम निर्माण होते

सावनी आदित्यच्या मनात सागरविषयी विष कालवत असते. पण आदित्यला समोर घडत असलेल्या गोष्टी दिसत असतात. त्यामुळे तो सागवर विश्वास ठेवू लागतो आणि तो बदलला असल्याचे सांगतो. पण तरीही सावनी चिडते आणि त्याला सागरवर विश्वास ठेवू नको असे म्हणते. आता आदित्य पुढे काय करणार हे मालिकेत पाहायला मिळणार आहे.
वाचा: शाहरुख, सलमान आणि आमिरही आम्हाला घाबरतात; पाकिस्तानी अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य

लकीचे बिंग फुटणार

इंद्रा लकीच्या खोलीमध्ये जाऊन साफसफाई करत असते. तिला कपडे धुण्यासाठी पाहात असते. तेवढ्यात तिला एक बॅग सापडते. ती बॅग मातीने खराब झालेली असते. त्यामुळे इंद्रा ती धुण्यासाठी मुक्ताकडे देते. मुक्ता ती बॅग उघडते तर तिला त्या बॅगमध्ये लकीचा एमबीएचा रिझल्ट सापडतो. तो बघून मुक्ताला देखील धक्का बसतो. आता मुक्ता लकीचे सत्य सर्वांसमोर आणणार का? हे मालिकेत पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point