मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  कार्तिकचा मुखवटा मुक्ता उतरवणार, आरतीने सांगितले सत्य; 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

कार्तिकचा मुखवटा मुक्ता उतरवणार, आरतीने सांगितले सत्य; 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 17, 2024 11:30 AM IST

गेल्या काही दिवसांपासून 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत वेगळ्या घटना घडत असल्याचे दिसत आहे. मालिकेतील कार्तिकचा मुखवटा मुक्ता उतरवणार आहे. आरतीने केली तिला मदत.

कार्तिकचा मुखवटा मुक्ता उतरवणार, आरतीने सांगितले सत्य; 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?
कार्तिकचा मुखवटा मुक्ता उतरवणार, आरतीने सांगितले सत्य; 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत कार्तिक हा सतत मुक्ताच्या मागे फिरताना दिसत आहे. तो मुक्ताला वेगळ्या प्रकारे स्पर्श कर, अंधारात तिला मिठी मार अशा काही गोष्टी करताना दिसत आहे. मुक्ता सर्वांसमोर त्याचा खरा चेहरा आणण्याचा प्रयत्न करते. पण कोणीही तिचे ऐकायला तयार नाही. उलट इंद्रा आणि स्वाती मुक्तावर चिडतात. तसेच मुक्ताला तिचे तोंड बदल करण्यास सांगतात. आता मुक्ता आगामी भागात काय पाऊल उचलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कार्तिकने उकळले सागरकडून पैसे

कार्तिक हा कुटुंबीयांसमोर साधेपणाचा आव आणण्याचा प्रयत्न करत आहे. तो महिलांचा किती आदर करतो, त्या माऊलींना कशा प्रकारे मदत करतो हे सतत इंद्रा आणि स्वातीसमोर सांगत असतो. त्यामुळे त्या दोघींचाही कार्तिकवर प्रचंड विश्वास असतो. यापूर्वी कार्तिकने त्याला एक महिला पैशांसाठी धमकावत असल्याचे सांगतो. बहिणीचा संसार नीट व्हावा म्हणून सागर कार्तिकला १५ लाख रुपयांची मदत करतो.
वाचा: 'या' उत्तराने लारा दत्ता हिने जिंकला ‘मिस युनिव्हर्स’चा ताज; परीक्षकही झाले होते थक्क

आरतीने सांगितले सत्य

कार्तिकचा घरा चेहरा कसा समोर आणता येईल असा विचार करत मुक्ता क्लिनिकमध्ये जाते. तेथे गेल्यावर तिची मदतनीस असलेली आरती राजीनामा देत असल्याचे सांगते. मुक्ता तिला खरे कारण विचारते तेव्हा ती सुरुवातीला खोटे बोलते. पण नंतर ती मुक्ताला कार्तिकमुळे हा राजिनामा देत असल्याचे सांगते. त्यानंतर मुक्ता तिला प्रश्न विचारते की तू त्याच्यासोबत दुबईला गेली होती का? त्याच्याकडून १५ लाख रुपये घेतले होते का? त्यावर आरती सर्वकाही सत्य सांगते. कार्तिक सर्वांची फसवणूक करत असल्याचे मुक्ताला जाणवते. तसेच आरती मुक्ताला देखील कार्तिक पासून लांब राहण्याचा सल्ला देते.
वाचा: ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटमधील 1BHK फ्लॅट सोडण्यास सलमान खान तयार का नाही? काय आहे कारण

सागर आला अचानक घरी

आदित्यला बरे नसल्यामुळे सागर आणि सावनीने गोव्याला जाण्याचा निर्णय रद्द केला. ते पळत आदित्यकडे जातात. त्याची काळजी घेतात. त्यानंतर सागर घरी येतो. सागर घरी येणार असल्याचे कोणालाही माहिती नसते. तो जेव्हा घरी येतो तेव्हा कार्तिक मुक्तावर जबरदस्ती करत असल्याचे त्याला दिसते. आता सागर काय पाऊल उचलणार हे मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे.
वाचा: अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया रुपेरी पडद्यावर, राम-सीतेची लोकप्रिय जोडी 'या' मराठी सिनेमात करणार काम

IPL_Entry_Point