मालिकांच्या टीआरपी यादीमध्ये 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका अव्वळ स्थानावर आहे. मालिकेतील मुक्ता, सई, सागर, सावनी, इंद्रा, लकी हे सर्वच पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहेत. आता 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत एक अतिशय वेगळे वळण आले आहे. साधीभोळी मुक्ता करायला जाते एक आणि त्याचा परिणाम काही तरी वेगळाच होताना दिसतो. त्यावर इंद्रा सतत नराजी व्यक्त करते, मुक्ताचा उद्धार करत असते. आज 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काय घडणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. चला जाणून घेऊया मुक्तावर इंद्रा चिडून नेमकं काय करणार...
'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या कालच्या भागात आपण पाहिले की एक व्यक्ती तोंडाला रुमाल गुंडाळून मुक्ताच्या क्लिनिकमध्ये डब्बा घेऊन जाते. त्या व्यक्तीच्या हातातील घड्याळ पाहून मुक्ताला तो सागर असल्याचे कळते. ती सागरला हा सगळा ड्रामा बंद करण्यास सांगते. पण सागर देखील हट्टाला पेटलेला असतो. तो मुक्ताला डब्बामधील खाऊन घ्यायला सांगतो. पण मुक्ता देखील कोणाचे ऐकत नाही. ती डब्बा तसाच ठेवते आणि उपाशी राहते. त्यानंतर मुक्ता तो तिच्या कामात व्यग्र राहाते.
वाचा: गेल्या महिनाभरापासून जुई गडकरी आजाराने त्रस्त, तरीही करते शुटिंग; काय झालं नेमकं जाणून घ्या?
मुक्ताने लकीचे बिंग फोडल्यामुळे इंद्राला राग येतो. ती सतत मुक्ताला घालून पाडून बोलत असते. तसेच संध्याकाळी ती जेवणात केवळ मांसाहारी जेवण बनवते. त्यामुळे ते जेवण मुक्ताला जेवता येणार नसते. हे ऐकून सागरला आणि सईला राग येतो. ते दोघेही न जेवताच तेथून निघून जातात. जेव्हा सागरच्या वडिलांना हे कळते तेव्हा ते देखील इंद्राला चांगलेच सुनावतात. शेवटी सई शाकाहारी जेवणाचे ताट घेऊन मुक्ताच्या खोलीमध्ये जाते. तिला ते जेवायला सांगते. त्याचवेळी सई मुक्ताला सांगते की सागरने देखील दिवसभर काही खाल्लेले नसते. त्यामुळे ते तिघेही बसून एकत्र जेवतात. तेवढ्यात इंद्रा येते आणि पाडवा असल्यामुळे सकाळी ६ वाजता उठून तयारी करायला सांगते. सागर आणि सई एक प्लान करतात की मुक्ताचा अलार्म बंद करतात. ते दोघे सगळी तयारी करतात. जेव्हा मुक्ता उठते तेव्हा तिला उशिर झालेला असतो. तिला तयारी करायची असते म्हणून ती घाबरते. बाहेर येऊन बघते तर सागरने संपूर्ण तयारी केलेली असते. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागात मुक्ता सागरला माफ करणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: ‘देवमाणूस’मधील किरण गायकवाड पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, मालिकेत दिसणार की सिनेमा येणार?
संबंधित बातम्या