'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागात मुक्ता लकीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणते. पण तरीही लकी ते मान्य करण्यास तयार नसतो. सागर लकीला शिक्षा म्हणून ऑफिसमध्ये प्यूनची नोकरी करण्यास सांगतो, त्याचा पॉकेट मनी पूर्णपणे बंद करुन टाकतो. हे सगळं पाहून इंद्रा चिडते. तिला मुक्ताचा प्रचंड राग येतो. ती मुक्तावर हात उचलणार असते तेवढ्यात सागर तिला थांबवतो आणि ज्याने चुक केली आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे असे बोलतो. त्यानंतर मुक्ता सागरला सुनावते. 'या घरात सगळ्यांसाठी वेगळे नियम आहेत. लकीने चुक केली तर त्याला शिक्षा देण्यात आली. पण जी चूक तुम्ही केली आहे त्याचे काय' असे मुक्ता बोलते. त्यानंतर ती तेथून निघून जाते. आता मालिकेत पुढे काय होणार जाणून घ्या...
मुक्ता क्लिनिकमध्ये गेलेली असते. लकीला शिक्षा दिल्यामुळे इंद्रा मुक्तावर चिडते. ती आज पाहून घरात केवळ मांस-मच्छी शिजणार असे मुक्ताला सांगते. तसेच जे बनवले आहे ते खायचे नसेल तर उपाशी रहा असे सांगते. त्यामुळे मुक्ता डब्बा न घेताच निघून जाते. क्लिनिकमध्ये काम करत असताना मुक्तासाठी कोणी तरी डब्बा घेऊन येतं. आता डब्बा घेऊन येणारी व्यक्ती आहे तरी कोण? हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.
वाचा: गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सई ताम्हणकरची स्वप्नपूर्ती! खरेदी केली नवी आलिशान गाडी
दुसरीकडे सावनीला सागर आणि इंद्राने दिलेली वागणून खटकते. ती रागारागात तावातावात घरी जाते आणि सगळा राग घरात काम करणाऱ्या बाईवर काढते. त्यानंतर ती रडायचे सोंग घेते आणि आदित्यला घडलेला प्रकार समजावते. त्यावर आदित्य चिडेल, सागरला फोन करेल असे तिला वाटत असते. पण आदित्य असे काहीच करत नाही. उलट या सगळ्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचा सल्ला तो सावनीला देतो. ते पाहून सावनी देखील चकीत होते. ती मुक्ताला मनातल्या मनात आणखी वाईट बोलते.
वाचा: 'स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण', गुढीपाडव्यानिमित्त माधुरी दीक्षितने शेअर केला मराठमोळा अंदाजातील व्हिडीओ
प्रेमाची गोष्ट मालिकेत कार्तिक हा मुक्ताच्या मागे लागला असल्याचे दिसत आहेत. सतत तिला स्पर्ध करणे, तिच्या जवळ जाताना दिसत आहे. आता अचानक कार्तिकने मुक्ताला मिठी मारली आहे. घरात अंधार करुन कार्तिक बसलेला असतो. तेवढ्यात मुक्ता येते आणि तो मुक्ताला मिठी मारतो. मुक्ता चिडते आणि हा काय व्हायात पणा आहे असे कार्तिकला म्हणते. पण कार्तिक नाटक करत असल्याचे मुक्ताला जाणवते. तेवढ्यात कार्तिकची पत्नी येते आणि तुम्ही दोघे इथे काय करताय असे विचारते. आता मुक्ता तिला खरं सांगणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मालिकेच्या आगामी भागात याचे उत्तर मिळणार आहे.