मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Marathi Natak: हटके कथानक अन् धमाल नाटक; 'प्रेम करावं पण जपुन'चा सुवर्ण महोत्सवी प्रयोग संपन्न!

Marathi Natak: हटके कथानक अन् धमाल नाटक; 'प्रेम करावं पण जपुन'चा सुवर्ण महोत्सवी प्रयोग संपन्न!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 26, 2023 07:52 AM IST

Prem Karav Pan Japun: नव्या युगातील प्रेम संबंध समजावून सांगणारं नाटक म्हणजे 'प्रेम करावं पण जपुन'. या नाटकाचा ५०वा प्रयोग नुकताच पार पडला आहे.

Marathi Natak
Marathi Natak

Prem Karav Pan Japun: मराठी मनोरंजन विश्वातच नव्हे, तर मराठी नाट्यसृष्टीत देखील सध्या नवनवे प्रयोग होत आहेत. अनेक क्लिष्ट विषय नाटकाच्या माध्यमातून अतिशय सोप्या पद्धतीने हाताळले जात आहेत. सध्या रंगभूमीवर अशी अनेक नाटके आहेत, जी नव्या पिढीवर भाष्य करतात दिसतात. अशा नाटकांपैकी एक आणि नव्या युगातील प्रेम संबंध समजावून सांगणारं नाटक म्हणजे 'प्रेम करावं पण जपुन'. मधुसंगिता थिएटर्स आणि अर्चना थिएटर्स निर्मित 'प्रेम करावं पण जपुन' या नाटकाचा ५०वा सुवर्ण महोत्सवी प्रयोग महाकवी कालिदास नाट्यगृह, मुलुंड येथे अनेक दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत पार पडला आहे.

यावेळी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप, ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेता स्वप्नील काळे, तसेच सोशल मीडिया स्टार सुरज खरात (पिंट्या) आणि समृद्धी टक्के (पिंकी) यांची या सोहळ्यासाठी विशेष उपस्थिती होती.

मधुसंगिता थिएटर्स आणि अर्चना थिएटर्स निर्मित 'प्रेम करावं पण जपुन' या नाटकाचे लेखन संकेत शेटगे यांनी केले आहे. तर, या नाटकाचे दिग्दर्शन विशाल-दिपेश यांनी मिळून केले आहे. मृदुला कुलकर्णी, संकेत शेटगे, भक्ती तारलेकर, विशाल असगणकर या कलाकारांच्या ‘प्रेम करावं पण जपुन’ नाटकात प्रमुख भूमिका आहे.

नाटकाच्या निर्मात्या माधुरी तांबे या नाटकाविषयी बोलताना सांगतात की, ‘आमची संपूर्ण नाटकाची टीम नवीन आहे. परंतु, मला सांगायला आनंद होत आहे की, नाटकातील कलाकार नवखे असूनही आज या नाटकाचा ५०वा प्रयोग हाऊसफुल्ल झाला. प्रेक्षकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून असं वाटतंय की, या नाटकाचे लवकरच १००हून अधिक प्रयोग होतील. मी नाटकाच्या टीमचे आणि मायबाप प्रेक्षकांचे मनापासून आभार मानते. त्यांचं प्रेम आमच्यावर असचं कायम राहू देत.’

IPL_Entry_Point

विभाग