Preity Zinta : लॉस एंजेलिसच्या भीषण आगीत अडकली प्रिती झिंटा! भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाली…
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Preity Zinta : लॉस एंजेलिसच्या भीषण आगीत अडकली प्रिती झिंटा! भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाली…

Preity Zinta : लॉस एंजेलिसच्या भीषण आगीत अडकली प्रिती झिंटा! भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाली…

Jan 13, 2025 11:21 AM IST

Preity Zinta On LA Fire: लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या भीषण आगीचे फोटो आणि व्हिडिओ माध्यमांतून सोशल मीडियावर समोर येत आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

प्रीति जिंटा
प्रीति जिंटा

Preity Zinta Post On LA Fire: लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे अनेक घरांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक हॉलिवूड स्टार्सच्या घरांनाही आग लागली आहे. अवघं हॉलिवूड या भीषण आगीत जळत आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा देखील तिचा पती जीन गुडइनफसोबत लॉस एंजेलिसमध्ये राहते. या आगीत प्रिती झिंटा देखील अडकली आहे. या भीषण आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रीती झिंटाने एक्सवर केलेल्या ट्विटमध्ये आपल्या चाहत्यांना तिथली परिस्थिती सांगितली. 

या पोस्टमध्ये तिने आपण या आगीपासून सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. याच पोस्टमध्ये तिने लॉस एंजेलिसमधील भीषण आगीवरही चिंता व्यक्त केली आहे. तिने लिहिलेली भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय म्हणाली प्रिती झिंटा?

प्रिती झिंटाने तिच्या एक्स हँडलवर लिहिले की, ‘एलएमधील आमच्या आजूबाजूच्या परिसराला आग लागेल आणि आमचे कुटुंब आणि मित्रांना एकत्र त्यांच्या घरातून बाहेर काढले जाईल किंवा हाय अलर्टवर ठेवले जाईल, असा दिवस मी माझ्या डोळ्यांनी बघेन, असे मला कधीच वाटले नव्हते. आकाशातून बर्फासारखी राख कोसळत असून, वारा शांत झाला नाही तर काय होईल, अशी भीती आणि अनिश्चितता आहे. आमची मुलं आणि आमचे कुटुंब सध्या एकत्र आहे. पान एकंदरीत हे वातावरण खूपच भयानक आहे.’

प्रितीने मानले देवाचे आभार!

प्रिती तिच्या पोस्टमध्ये पुढे म्हणाली की, "माझ्या सभोवतालचा विध्वंस पाहून मी दु:खी झाले आहे आणि देवाचे आभारी आहे की, आम्ही अद्याप सुरक्षित आहोत. या आगीमुळे विस्थापित झालेल्या आणि सर्वस्व गमावलेल्या लोकांसोबत माझी संवेदना आहे. लवकरच आग आटोक्यात येईल आणि सगळं काही पूर्ववत होईल, अशी आशा आहे.'

आपल्या या पोस्टमध्ये प्रिती झिंटाने अग्निशमन विभाग आणि अग्निशमन दलाचे आभार मानले आहेत, जे या आगीपासून लोकांचे जीव वाचवत आहेत आणि मालमत्तेचे रक्षण करत आहेत. तिने सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली आहे. प्रिती झिंटाने २०१६मध्ये जीन गुडइनफसोबत लग्न केले होते. प्रीती झिंटा लॉस एंजेलिसमध्ये पतीसोबत एका सुंदर बंगल्यात राहत होती.

आगीत भस्म होतंय संपूर्ण शहर!

लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे हजारो लोकांना आपले घर सोडावे लागले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल आणि बचाव कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत. बाधित भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. सोशल मीडियावरही लोक या दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. जोरदार वाऱ्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. हे संकट लवकर संपावे यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.

Whats_app_banner