Preity Zinta Real Name: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल' प्रीती झिंटा सध्या मनोरंजन विश्वापासून दूर असली तरी, सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्टेड असते. नुकताच प्रीतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रीती झिंटा स्वतःच्या नावाचा खुलासा करताना दिसली आहे. गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की, या अभिनेत्रीचे नाव आधी प्रीतम सिंह झिंटा होते, जे नंतर तिने बदलून प्रीती झिंटा केले. या अफवेवर आता स्वतः अभिनेत्री प्रीती झिंटाने तिची प्रतिक्रिया दिली आहे, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
प्रीती झिंटा हिने एका व्हिडीओ शेअर करून तिच्या नावाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी आपल्या व्हिडीओमध्ये प्रीती झिंटा म्हणाली की, विकिपीडिया, गुगल आणि अनेक मीडिया पब्लिकेशन्स सांगतात की, तिचे नाव आधी प्रीतम सिंह झिंटा होते, जे नंतर तिने बदलून प्रीती झिंटा केले. मात्र, यात तथ्य नाही. आपले नाव प्रीतम सिंह झिंटा कधीच नव्हते, हे लोकांना स्पष्ट करण्यासाठी तिने हा व्हिडीओ जारी केल्याचे या अभिनेत्रीने म्हटले आहे.
अभिनेत्री प्रिती झिंटा हिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आज जेव्हा मी एका मीडिया आर्टिकलमध्ये माझे खरे नाव प्रीतम सिंहा झिंटा असल्याचे वाचले, तेव्हा मला स्वतःला थांबवताच आलं नाही. मी तुम्हाला सांगू इच्छिते की, ही एक फेक न्यूज आहे. या नावामागचं सत्य हे आहे की, आमच्या ‘सोल्जर’ चित्रपटाच्या सेटवर बॉबी देओल मला गंमतीने प्रीतम सिंह म्हणत असे. आमचा हा चित्रपट हिट झाला, आमची मैत्री घट्ट झाली आणि हे नाव मला इतकं चिकटलं की, आताही ते माझा पिच्छा सोडत नाहीये.’
प्रिती झिंटाने पुढे म्हटले की, 'तेव्हापासून आजपर्यंत मी लोकांना सांगून सांगून थकले आहे की, माझे खरे नाव प्रीती झिंटाच आहे आणि मी चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर माझे नाव बदलले नाही. माझ्या या खुलाशानंतर तरी मीडियावाले आपली चूक सुधारतील अशी आशा आहे.'
संबंधित बातम्या