दसऱ्याच्या मुहूर्तावर बॉलिवूडमधील कलाकार नवनवीन गोष्टी खरेदी करताना दिसत आहेत. नुकताच अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेत्री पूजा हेगडेने नव्या कार घेतल्या आहेत. त्यांचे नव्या कारसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यापाठोपाठ आता अभिनेत्री प्रिती झिंटाने आता नवे घर खरेदी केल्याचे समोर आले आहे. प्रितीने घेतलेले हे नवे घर कुठे आहे? या नव्या घराची किंमत किती? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
प्रिती झिंटाने मुंबईतील वांद्रे येथील परिसरात नवा फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटची किंमत १७.०१ कोटी रुपये आहे. हा फ्लॅट १४७४ क्वेअर फिटमध्ये आहे. प्रितीच्या पाली हिलमधील या फ्लॅटसोबत दोन पार्किंग देखील देण्यात आल्या आहेत. प्रितीने २३ ऑक्टोबर रोजी या फ्लॅटची रजिस्ट्री केली आहे. त्यासाठी तिने ८५.०७ लाख रुपये स्टँप ड्यूटी भरली आहे.
वाचा: 'कॉफी विथ करण ८' ते 'चंद्रमुखी २', या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणारे सिनेमे
समोर आलेल्या माहितीनुसार, प्रितीची ही प्रॉपर्टी नर्गिस दत्त रोड येथे आहे आणि बिल्डींगमधील ११व्या मजल्यावर आहे. प्रिती लग्नापूर्वी या फ्लॅटमध्ये राहात होती. हा फ्लॅट तिच्यासाठी खास होता त्यामुळे तिने हा खरेदी केला आहे.
प्रिती झिंटा गेल्या काही दिवसांपासून प्रिती झिंटा ही चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. तिने जेने गूडइनफशी लग्न केले आणि कॅलिफोर्नियामध्ये शिफ्ट झाली. २०१८मध्ये तिने प्रितीने भैयाजी सुपरहिट या चित्रपटात काम केले. त्यानंतर लग्नाच्या पाच वर्षांनंतर प्रितीने सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांना जन्म दिला. आता प्रितीने नवे घर खरेदी केल्यावर पुन्हा चर्चेत आली आहे.
संबंधित बातम्या