मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सरसेनापती चित्रपटगृहात पाय रोवून खडे! ११ दिवसात बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची घौडदौड

सरसेनापती चित्रपटगृहात पाय रोवून खडे! ११ दिवसात बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची घौडदौड

Payal Shekhar Naik HT Marathi
Jun 07, 2022 01:23 PM IST

'सरसेनापती हंबीरराव' प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटगृहात पाय रोवून उभा आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

हंबीरराव
हंबीरराव

स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या शौर्यगाथेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. उत्कृष्ट दिग्दर्शन, सीन्सची भव्यदिव्य आखणी, कलाकारांची निवड, १ हजारहून अधिक व्यक्तींची वेशभूषा, प्रचंड मोठ्या संख्येसोबत चित्रीकरण हे सगळं यशस्वीपणे पेलून नेणारा लोकप्रिय दिग्दर्शक प्रवीण तरडे (pravin tarde) याचा 'सरसेनापती हंबीरराव' (sarsenapati hambirrao)प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटगृहात पाय रोवून उभा आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पहिल्या ११ दिवसांतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे.

सध्या चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपटांचा बोलबाला आहे. त्यातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांच्या अतुलनीय पराक्रमावर आधारलेले चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातील एक म्हणजे 'सरसेनापती हंबीरराव' मात्र या चित्रपटाने आपलं वेगळेपण टिकवून ठेवत हिंदी चित्रपटांना देखील मात दिली आहे. 'हंबीरराव' चित्रपटाने पहिल्या ११ दिवसांतच कोट्यवधींची कमाई करत नवा इतिहास रचला आहे. या चित्रपटाने पहिल्या ११ दिवसात तब्बल १८ कोटी २० लाखांची कमाई केली आहे. मराठी भाषिक चित्रपटासाठी ही नक्कीच एक कौतुकास्पद गोष्ट आहे.

'हंबीरराव' चित्रपटाने पहिल्या दिवशीच १ कोटींचा आकडा गाठला होता. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने २. ५० कोटींची कमाई केली होती. एकूणच पहिल्या वीकेण्डला चित्रपटाने ४ कोटींच्या आसपास कमाई केली होती. आता ११ दिवसांतच चित्रपटाने १८ कोटींचा टप्पा गाठला आहे. तर अजूनही या चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरू आहे. चित्रपटात प्रवीण तरडे याने हंबीररावांची भूमिका साकारली आहे तर गश्मीर महाजनी याने छत्रपती शिवरायांची अन संभाजी राजांची भूमिका साकारली आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या