Prathamesh Parab: 'दगडू' परत येतोय! प्रथमेश परबच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर चर्चेत
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Prathamesh Parab: 'दगडू' परत येतोय! प्रथमेश परबच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर चर्चेत

Prathamesh Parab: 'दगडू' परत येतोय! प्रथमेश परबच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर चर्चेत

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 12, 2024 11:56 AM IST

Prathamesh Parab Movie: ‘टाईमपास’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रथमेश परब. त्याचा आता एक नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चला जाणून घेऊया प्रथमेशच्या सिनेमाविषयी...

Prathamesh Parab
Prathamesh Parab

मराठी चित्रपटसृष्टीमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘टाईमपास.’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्पड फाड कमाई केली होती. या चित्रपटात अभिनेता प्रथमेश परबने साकारलेली दगडू ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. आजही अनेकजण प्रथमेशला दगडू या नावाने ओळखतात. आता याच दगडूचा एक नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची नुकतचा घोषणा करण्यात आली असून पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

काय आहे चित्रपटाचे नाव?

विविधांगी विषयावर चित्रपट बनवण्याची परंपरा मराठी सिनेसृष्टीला लाभली आहे. काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याच्या उद्देशाने नवनवीन संकल्पनांवर मेहनत घेतली जात असल्याचे दिसत आहे. अशातच प्रथमेश परबच्या 'हुक्की' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. तसेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आले आहे. या मोशन पोस्टरवर भर पावसात विजेच्या खांबावर बसलेला कावळा आणि साळुंकी दिसत आहे. तसेच या पोस्टरवर 'संघर्ष... जोखीम... विजय' असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा ही उत्सुकता वाढवणारी असल्याचे दिसत आहे.

प्रथमेशच्या चित्रपटाविषयी

'हुक्की'मध्ये प्रथमेश परब मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याच्या जोडीला रावी किशोर, प्रशांत मोहिते, महेश पाटील आदी कलावंत आहेत. नितीन रोकडेने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही.
वाचा: भर मांडवात राणी मुखर्जीवर चिडली काजोल, फटका मारतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल

प्रथमेशच्या कामाविषयी

प्रथमेश परब काही दिवसांपूर्वी लग्न बंधनात अडकला आहे. त्याने लेखिका क्षितिजाशी लग्न केले आहे. प्रथमेशच्या कामाविषयी बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी त्याचा 'होय महाराजा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला होता. त्यानंतर तो 'डिलिव्हरी बॉय', ढिशक्यांव, पोरी ले पोरी चित्रपटात दिसला होता. त्यापाठोपाठ त्याने एका वेब सीरिजमध्ये देखील काम केले आहे. आता त्याच्या हुक्की या चित्रपटाची चर्चा रंगली आहे.

Whats_app_banner