मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Delivery Boy Trailer: सरोगसीवर आधारित प्रथमेश परबच्या ‘डिलिव्हरी बॉय’चा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित

Delivery Boy Trailer: सरोगसीवर आधारित प्रथमेश परबच्या ‘डिलिव्हरी बॉय’चा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 30, 2024 07:39 AM IST

Prathamesh Parab Movie: ‘डिलिव्हरी बॉय’ हा चित्रपट सरोगसीवर भाष्य करणारा आहे. एक वेगळ्या विषयावर आधारित हा सिनेमा पाहाण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Delivery Boy
Delivery Boy

सध्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे दिसत आहे. या चित्रपटांना देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहेत. आता लवकरच सरोगसीवर भाष्य करणारा ‘डिलिव्हरी बॉय’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.

‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटाच्या २ मिनिटे ३० सेकंदाच्या ट्रेलरमध्ये अंकिताला गावात एक फर्टिलिटी सेंटर काढायचे स्वप्न पाहात असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला इस्टेट एजंट असलेला प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप मदत करताना दिसत आहेत. परंतु हे करताना त्यांना अनेक जुगाड करावे लागत आहेत, त्यांच्या या प्रयत्नांना यश येणार की त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहाणार, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्कंठा प्रचंड वाढवून ठेवली होती त्यातच आता 'डिलिव्हरी बॉय'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
वाचा: मयूरी देशमुखच्या 'लग्नकल्लोळ'चा टीझर पाहिलात का? होईल हसू अनावर

मोहसीन खान दिग्दर्शित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटात प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप आणि अंकिता लांडे पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

‘डिलिव्हरी बॉय’बद्दल दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात, "सरोगसीबद्दल आपल्याकडे अनेक गैरसमजुती आहेत, अनेक ठिकाणी आजही जुनीच विचारसरणी घेऊन लोक जगत आहेत आणि हीच विचारसरणी बदलण्याचा आम्ही या चित्रपटातून प्रयत्न केला आहे. खरंतर सरोगसी हा खूप नाजूक विषय आहे, मात्र त्याचे गांभीर्य जाऊ न देता मनोरंजनात्मकरित्या प्रेक्षकांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही 'डिलिव्हरी बॉय'मधून केला आहे. अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने आम्ही हा विषय तुमच्यासमोर मांडला आहे. ही कथा तुम्हाला कधी पोट धरून हसवेल तर कधी तुमचे मन हळवे करेल. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत एकत्र पाहावा."

WhatsApp channel