'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता लागून राहिली होती. त्यात काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे एक भन्नाट पोस्टर सोशल मीडियावर झळकले आणि आता प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारे एक धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हटके विषयावर आधारित 'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटाचा टीझर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
'डिलिव्हरी बॉय' चित्रपटाच्या १ मिनिट २ सेकांदाच्या टीझरमध्ये प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप गावातील काही महिलांना 'सरोगसी'साठी तयार करताना दिसत असून यातून होणारा कल्लोळ आपल्याला चित्रपटात दिसणार आहे. आता हे दोघे गावातील महिलांना सरोगसीसाठी का तयार करत आहेत, याचे उत्तर मात्र प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे. या चित्रपटात प्रथमेश आणि पृथ्वीक बरोबर अंकिता लांडे पाटीलही प्रमुख भूमिकेत आहे. 'डिलिव्हरी बॉय'मधून प्रथमेश परब एका वेगळ्याच लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार असून त्याचा हा नवा अंदाज चाहत्यांना नक्कीच आवडेल.
वाचा: लग्नाच्या दोन महिन्यांतच अजय देवगणच्या अभिनेत्रीने दिली ‘गुडन्यूज’! फोटो शेअर करत म्हणाली...
'डिलिव्हरी बॉय' हा चित्रपट सरोगसीवर भाष्य करणारा आहे हे टीझरवरून कळतच आहे. आता हा नाद खुळा भाऊ आणि त्याचा जोडीदार गावातील महिलांना सरोगसीसाठी तयार करतो की आणखी अडचणी मागे लावून घेतो, हे बघताना प्रेक्षकांना धमाल येणार हे नक्की! मोहसीन खान दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले आहे. हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.